Friday, December 30, 2011

असे पाहुणे येती...

'पाहुणे' हा शब्दच मनात एक आनंद निर्माण करतो. पाहुणा हा येताना आनंदच घेऊन येत असतो. ( अर्थात इथं हा उल्लेख बोलावलेल्या पाहुण्यांबद्दल आहे. उगीच गैरसमज नको. ) आपल्याकडे पाहुणे येत असतात. तसंच आपणही कधी - कधी कुणाकडे पाहुणे म्हणून जातोचना. अर्थात आजकाल शहरांमध्ये वनबीएचकेच्या युगात पाहुणा येणार म्हटला तरी धडकी भरते.
मात्र आज इथं या ब्लॉगवर 'गेस्ट एडिटर' विषयी लिखाण करण्यात आलं आहे. वृत्तपत्रांमध्ये गेस्ट एडिटर ही संकल्पना चांगलीच रूजलेली आहे. मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियात आणि त्यातही मराठीमध्ये झी २४ तासनं गेस्ट एडिटरच्या माध्यमातून नेत्यांमधील संपादकीय गुण प्रेक्षकांसमोर आणण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. नेत्यांचा दररोजच पत्रकारांबरोबर संबंध येत असतो. राजकीय नेत्यांच्या विविध भूमिकांवर वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून अनेकदा सडकून टीकाही होत असते. नेते मंडळेही 'माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला', हे वाक्य अनेकदा टोलवून देत असतात. त्यामुळे पत्रकार आणि राजकीय नेते यांचं नातं हे, 'तुझं माझं जमेना आणि....' या प्रकारातलं असतं.
मी नोकरी करत असलेल्या झी २४ तासनं गेस्ट एडिटर ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय केली आहे. आतापर्यंत झी २४ तासमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही दिग्गज मंडळी गेस्ट एडिटर म्हणून आले आहेत. नेते असलेली ही मंडळी उत्तम संपादकही आहेत, हे या निमीत्तानं जवळून पाहता आलं. इलेक्ट्रॉनिक मीडियाचं कामकाज चालतं तरी कसं ? याची उत्सुकता नेत्यांच्या मनात असते. इनपुट, आऊटपूट, व्हीसॅट, स्टुडिओ, पीसीआर पाहताना त्यांच्या चेह-यावरील जिज्ञासेचे भाव बरंच काही सांगून जातात.

एखादी बातमी कशी प्रझेंट करावी याची जाणही नेत्यांना आहे. संपादकीय बैठकीत विविध बातम्यांवर चर्चा करताना राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची पत्रकारितेतली माहिती अपडेट असल्याचं लक्षात आलं. उद्धव ठाकरेंनी संपादकीय बैठकीत शेती आणि शेतक-यांच्या आंदोलनाच्या बातम्यांना प्राधान्य दिलं होतं. तर शरद पवारांनी एका नेत्याच्या 'कारनाम्याची' बातमी जर VISUELS असतील तर हेडलाईन करा असं सांगत सगळ्यांचीच विकेट काढली. राज ठाकरेंनी घेतलेल्या मोहन भागवतांच्या भेटीचं विश्लेषणही त्यांनी खास त्यांच्या शैलीत केलं. कधी - कधी मित्र पक्षांना धक्का देण्यासाठी मीही मातोश्रीवर बाळासाहेबांकडे जात असतो, असं सांगत त्यांनी राजकारणाचा कानमंत्रही दिला.
वरील सर्व नेत्यांबरोबर ऑफिसमधल्या सर्व स्टाफला संवाद साधता आला. या नेत्यांनीही दिलखुलासपणे कोणताही पडदा न ठेवता सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिल्याचा अनुभव या निमीत्तानं सगळ्यांनाच आला. गेस्ट एडिटर येणार म्हटल्यावर सगळेच आपापले प्रश्न घेऊन तयार असतात. कौटुंबिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रश्न गेस्ट एडिटरला विचारले जातात. राज ठाकरेंची बेधडक शैली, उद्धव ठाकरेंची लपवाछपवी न करता सत्यच सांगण्याची शैली पुन्हा एकदा सर्वांना पाहता आली.
शरद पवारांसारखा राज्य आणि देशातल्या राजकारणावर छाप असणारा नेता या निमीत्तानं जवळून पाहता आला. गेस्ट एडिटर म्हणून त्यांच्यात असलेले पत्रकारितेचे गुणही सगळ्यांना कळाले. कृषी, क्रीडा, राजकारण, सहकार या सारख्या विविध विषयांचा शरद पवारांचा मोठा अभ्यास आहे. परिणामी त्यांना विचारण्यासाठी प्रत्येकाकडे किमान तीन - चार प्रश्न होतेच. अर्थात सगळ्यांचे एवढे प्रश्न जर विचारले गेले असते तर गेस्ट एडिटरला मुक्कामच ठोकावा लागला असता. अर्थात जे प्रश्न विचारले गेले त्याची शरद पवारांनी सविस्तर उत्तरं दिली. त्यांचा शेतीवर असलेला अभ्यास मनाला भावला. शेतक-यांनी फक्त कापूस आणि ऊसाऐवजी इतर पिकांचाही विचार करावा असा पर्याय त्यांनी सुचवला. सहकार, कारखानदारी, राजकारण यातल्या सगळ्याच, काही खोचक प्रश्नांनाही गेस्ट एडिटर असलेल्या शरद पवारांनी उत्तरं दिली.
य़शवंतराव चव्हाण यांचा वाचनाचा व्यासंग किती दांडगा होता हे, या निमीत्तानं सगळ्यांना कळालं. जगात गाजणारं कोणतंही इंग्रजी पुस्तक हे यशवंतरावांनी वाचलेलं असायचं. तब्बल पंधरा हजार ग्रंथ यशवंतरावांच्या संग्रही होते. विदेशातल्या अनेक परराष्ट्रमंत्र्यांबरोबर त्यांची मैत्री होती. जगातल्या सर्वात्तम पुस्तकांवर यशवंतराव चव्हाणांची विदेशातल्या बड्या हस्तींबरोबर चर्चा व्हायची.
अशी दिलखुलास मुलाखत सुरू असताना शरद पवारांचे दिलदार मित्र बाळासाहेब ठाकरे यांचा विषय चर्चेत येणं सहाजिकच म्हणावं लागेल. बाळासाहेबांची मैत्री, शिवसेनेचा उदय, गल्लीतल्या सामान्य कार्यकर्त्यांना शिवसेनेनं दिलेली प्रतिष्ठा यावर शरद पवारांनी सांगितलेल्या आठवणी मनात घर करून राहणा-या आहेत. दोन मित्रांमधला हा जिव्हाळा पुढच्या पिढीत तितकासा उतरलेला नाही, ही 'जनरेशन गॅप'ही त्यांनी प्रांजळपणे कबूल केली. अर्थात पुढच्या पिढीत तितका जिव्हाळा नसला तरी त्यांच्यात मैत्री असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनाप्रमुखांच्या राजकीय विचारसरणीबद्दल मतभेद आहेत. मात्र त्यांचा दिलदारपणा, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी जपलेली मैत्री आताच्या राजकारणात दुर्मिळ असल्याचं सांगत पवारांनी सध्याचं राजकारण कसं गढूळ झालंय हे ही दाखवून दिलं. सुप्रिया सुळे पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक लढवत असताना शिवसेनेनं उमेदवार दिला नाही. मित्राची मुलगी राजकारणात येत आहे, म्हटल्यावर शिवसेनाप्रमुखांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उमेदवार दिला नाही, ही आठवण शरद पवारांनी सांगितल्यावर या दोन्ही नेत्यांमधली मैत्री किती निरपेक्ष आहे, हेच पुन्हा सिद्ध झालं. राजकारणात वैयक्तीक प्रहार न करताही मैत्री जपता येते, हेच या दोन मित्रांकडे पाहून लक्षात येतं. अर्थात हे जर इतर नेत्यांच्या लक्षात आलं तर, राज्यातलं राजकारण स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही.

Thursday, December 8, 2011

ती गाणी, ते दिवस !

गाणी, ही जवळपास प्रत्येकालाच आवडतात. गाण्याला भाषेचंही बंधन नाही. सुश्राव्य वाटणारी गाणी अर्थ माहित नसली तरी ती गुणगुणली जातात. सध्या गाजत असलेले 'कोलावरी डी' हे गाणंही असंच लोकप्रिय झालं आहे. हैदराबादमध्ये नोकरीला असताना अनेक तेलुगु चित्रपट पाहिले. वर्षम, मल्लेश्वरी, घर्षणा या चित्रपटातील गाणी आजही माझ्या ओठांवर आहेत.
मात्र माझ्या हृदयाला स्पर्श करणारी गाणी होती ती आशिकी चित्रपटातली. 1990 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी मी आठवीत होतो. संभाजीनगरमध्ये रॉक्सी चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तेव्हा त्या चित्रपटाचे सकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत सात शो लावण्यात आले होते. तरूणाईनं हा चित्रपट डोक्यावर घेतला होता. आता मी आठवीत म्हटल्यावर काही तरूण नव्हतो. पण तारूण्याच्या जवळपास जायला सुरूवात झाली होती. आशिकी प्रमाणे सात शो लागण्याचं भाग्य नंतर साजन आणि माहेरची साडीच्या वाट्याला आलं होतं.
प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी आशिकी चित्रपटातली गाणी जणू काही प्रेमग्रंथच होता. अर्थात हा चित्रपट तेव्हा मी थिएटरमध्ये पाहिला नव्हता. अर्थात कोणत्या वडलांना मुलांनी अशी थेरं पाहणं आवडलं असतं ? पण तेव्हा दूरदर्शनवरील चित्रहारमध्ये दर बुधवारी आशिकीतलं एकतरी गाणं लागायचंच. त्यावेळी केबल आणि खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या नव्हत्या. त्यामुळं बुधवारी चित्रहारमध्ये दाखवलेली गाणी
दुस-या दिवशी सगळ्यांच्या ओठांवर असायची. शाळेत जाताना बसपासून ते वर्गामध्येही तीच गाणी म्हटली जायची.
आशिकीतल्या गाण्यांमध्ये काय नव्हतं ? प्रेमात पडलेला, प्रेमभंग झालेला, प्रेमात पडू पाहणारा या सर्वांना भावतील अशी गाणी त्यात होती. 'जाने जिगर जानेमन' हे गाणं तर तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होतं. याच गाण्याबरोबर चित्रपटातली इतर गाणी आजही हृदयाच्या गुलाबी कप्प्यात कस्तूरी प्रमाणं जपून ठेवली आहेत. जसं पहिलं प्रेम विसरता येत नाही. तशीच या चित्रपटातली गाणी मनातून जात नाहीत. प्रेमभंग झालेल्यांसाठी 'मैं दूनिया भूला दूँगा तेरी चाहत में' हे गाणं विशेष होतं. अर्थात माझा कोणताही प्रेमभंग झालेला नव्हता, हे माझ्या विघ्नसंतोषी मित्रांसाठी आधीच नमूद करून ठेवत आहे. नाही तरी पत्रकारांना कशात काही नसताना, काही तरी असल्याचा वास येत असतो, म्हणून खुलासा केलेला बरा. अर्थात याचा काहीही परिणाम होणार नाही, याची मला खात्री आहे. कारण 'ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या...'
चला वरील मुद्दा बाजूला ठेऊन अजून थोडं मागं जाऊ या. आशिकीच्या आदल्या वर्षी प्रदर्शित झालेला रामलखन आणि त्याच्या आधी 1988 मधल्या तेजाबच्या गाण्यांनीही चांगलाच मनाचा ठाव घेतला होता.
तेव्हा तर स्वत:चं नाव सांगता येत नसणा-या मुलांच्या तोंडून माधूरीचं 'एक दो तीन...' हे गाणं हमखास ऐकायला मिळायचं. आशिकी चित्रपटानंतर सडक आणि साजन चित्रपटातल्या गाण्यांनीही मनात चांगलंच घर केलं होतं. दहावीला जाईपर्यंत हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले होते. अर्थात साजन चित्रपट काही थिएटरमध्ये पाहता आला नव्हता. तो चित्रपट गणेशोत्सवाच्या काळात व्हीडीओवर पाहिला होता. अर्थात गणेशोत्सवाच्या काळात व्हीडीओवर चित्रपट पाहण्याची गंमत या पिढीतल्या मुलांना आणि तरूणांना कशी कळणार म्हणा ? याच प्रकारचं वाक्य माझ्या वडलांच्या तोंडी असायचं. ते म्हणतात गणेशोत्सवातल्या मेळ्यांची मजा तुम्हाला काय कळणार ? माझा मुलगा मोठा झाल्यावर गणेशोत्सवातली कोणती मजा सांगेल ? हे त्या गणेशालाच माहित.
मात्र शाळेत असताना सडक चित्रपट मात्र मी थिएटरमध्ये पाहिला होता. शाळेच्या सहलीसाठी वडलांनी खर्चण्यासाठी तब्बल 70 रूपये दिले होते. त्यातले मी फक्त 30 रूपये खर्च केले. मग सहलीवरून आल्यावर मी आणि माझा लहाना भाऊ रवींद्रनं बाल्कनीचं तिकीट काढून संभाजीनगरातल्या अंबा थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला. तेव्हा बाल्कनीचं तिकीटही पंधरा रूपये होतं. मग उरलेल्या दहा रूपयात इंटरव्हलमध्ये वडापाव खाऊनही काही पैसे उरले होते.
शाळेनंतर महाविद्यालयीन जीवन सुरू झालं. तेव्हाही अनेक चित्रपट पाहण्यात आले. त्यातली अनेक गाणी ऐकली, गुणगुणली. मात्र आजही मनावरून आशिकी, सडक आणि साजन मधली गाणी पुसली जात नाहीत. त्यातही आशिकीतल्या गाण्यांचा मनावर मोठा पगडा कायम राहिला आहे. प्रेमात पडलेल्यांचा तो प्रेमग्रंथ आजही माझ्या मनात तसाच जपून ठेवला आहे. त्या प्रेमग्रंथातली पानं कधीही निवांत क्षणी चाळली जातात. त्या आठवणीत मन हरपून जातं. अर्थात याचा कुणाला पत्ताही लागत नाही. आपल्या आठवणी या आपल्या साठीच असल्यावर त्याचा कुणाला पत्ता लागण्याची गरजच काय ?

Tuesday, November 8, 2011

पाकिस्तानात चार हिंदू डॉक्टरांचे हत्याकांड, हिंदूस्थानात कोणी ऐकणार आहे का ?

पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात चार हिंदू डॉक्टरांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. शिकारपूरनजीकच्या चक टाऊन परिसरातल्या एका क्लिनिकमध्ये हे ह्त्याकांड करण्यात आलं. या घटनेत तीन हिंदू डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. तर चौथ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाली. अर्थात पाकिस्तानात हिंदूंच्या या नरकयातना काही नवीन नाहीत. मात्र या नरकयातना कधी थांबणार ? याचंही उत्तर कोणाकडे नाही. संपूर्ण पाकिस्तानातच हिंदू समाजाला टार्गेट केलं जात आहे. चक टाऊन परिसरात असलेले पन्नास हजार हिंदू आणि पाकिस्तानातल्या विविध भागात असलेले हिंदू दहशतीखाली जगत आहेत. अर्थात माझ्यासारख्या मुंबईत बसलेल्या एका पत्रकाराला त्या विषयी काय माहिती आहे ? असा प्रश्न कोणत्याही सेक्युलर किंवा अभ्यासू व्यक्तीला पडणं सहाजिक आहे. चार हिंदू डॉक्टरांची हत्या झाल्याची बातमी सगळ्यांनाच माहिती झाली आहे. अर्थात वृत्तपत्रात आल्यामुळं ती माहित झाली आहे.
मागील आठवड्यातही शंभर हिंदू तरूणांनी धर्मांतर करून ते मुस्लिम झाल्याची एक बातमी मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीनुसार मशिदीच्या इमामने या तरूणांनी त्यांच्या स्वेच्छेने आणि कोणत्याही दबावाशिवाय धर्मांतर केल्याचा दावा केलाय. अहो इमामसाहेब मात्र पाकिस्तानात तर सोडाच पण कधी हिंदूस्थानातही कधी कोणत्या शंभर मुस्लिम तरूणांनी स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारल्याची बातमी कधी कोणी वाचलेली नाही. अगदी सेक्युलरसुद्धा हे मान्य करतील. पाकिस्तानात भरदिवसा हिंदू तरूणींना पळवून नेऊन त्यांच्या बरोबर निकाह लावले जात आहेत. हिंदू तरूणींची ही विटंबना तिथं खुलेआम सुरू आहे. ही सगळी माहिती कोणत्याही वाचकाला pakistanhindupost.blogspot.com/ वर वाचता येईल.


चार हिंदू डॉक्टरांच्या हत्येच्या निषेधार्थ तिथल्या हिंदूंनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. मात्र तिथल्या इस्लामी राजवटीत हिंदूंना कोणताही न्याय मिळण्याची शक्यता नाही. तिथले हिंदू हिंदूस्थानकडे डोळे लावून बसले आहेत. आम्हाला हिंदूस्थानात आश्रय द्या, अशी त्यांची मागणी आहे. मात्र आमच्या धर्मनिरपेक्ष सरकारकडे हिंदूंसाठी वेळ नाही, अर्थात हिंदूंसाठी तो कधीच नसतो. नाही तरी आपल्या देशात दोन कोटी बांग्लादेशी सुख आणि समाधानानं राहत आहेत. त्यात जर आपल्या रक्तामांसाच्या पाकिस्तानातल्या हिंदूंची भर पडली तर असा कोणता फरक पडणार आहे ?


पाकिस्तानला जर तिथल्या हिंदूंना संरक्षण देता येत नसेल तर त्यांनी तिथल्या हिंदूंना भारतात जाण्याची परवानगी द्यावी. आणि हिंदूस्थानातल्या मुस्लिमांनाही पाकिस्तानात बोलवावं. कारण ज्या देशांची फाळणीच धर्माच्या आधारावर झालेली आहे, तिथं दोन्ही देशांमधील नागरिकांची आदलाबदल करावीच लागेल.

काश्मीरमधली अमरनाथ यात्रा बंद करण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 'मुंबईतून एकही मुस्लिम हज यात्रेला जावू देणार नाही' असा खणखणीत इशारा दिला होता. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीतपणे पार पडली होती. असाच खणखणीत इशारा पाकिस्तानला भरण्याची हिंमत आपल्या केंद्र सरकारमध्ये आहे का ? ही हिंमत नसल्यामुळेच पाकिस्तानातल्या हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.

Monday, October 17, 2011

महायुतीचा 'भीम'टोला !

खडकवासला मतदारसंघात महायुतीनं मिळवलेला अनपेक्षित विजय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मस्तवाल राजकारणाला सणसणीत चपराक लगावणारा ठरला आहे. रमेश वांजळेंच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली सहानभुती, राष्ट्रवादीची मनी आणि मसल पॉवर, हातात असणारी सर्व सत्ताकेंद्र यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं पहिल्या दिवसापासूनच जड मानलं जात होतं. मात्र मी सांगेन तेच धोरण आणि तोरण, म्हणणा-यांचं मतदारांनी राजकीय सरणच इथं करून टाकलं.
मनसेच्या तिकीटावर निवडून आलेल्या रमेश वांजळेंच्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या गोटात ओढून आणलं. रमेश वांजळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असं विधान सुप्रिया सुळे यांनी नागपूरात करून टाकलं होतं. रमेश वांजळेंबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सलोख्याचे संबंध होते, असं सांगण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मात्र प्रेताच्या टाळूवरील लोणीही ओरबडून खाण्याची ही स्वार्थी राजकीय प्रवृत्ती सामान्य मतदारांना मुळीच पसंत पडली नाही.
हर्षदा वांजळे या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या होत्या. विधानसभा निवडणुकीत कै. रमेश वांजळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मागितलं होतं. मात्र तिथं त्यांची हेटाळणी करण्यात आली. नंतर ते मनसेच्या तिकीटावर निवडूनही आले. अर्थात हा इतिहास सर्वांना माहित आहे. तोच इतिहास मतदारांच्याही लक्षात होता. त्यामुळे हर्षदा वांजळेंची राजकीय कोलांटउडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रेताच्या टाळूवरील लोणीही ओरबाडण्याच्या प्रवृत्तीचा मतदारांना वीट आला. आणि याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्याच बालेकिल्ल्यात दादा आणि ताईच्या साक्षीनं पराभवाला सामोरं जावं लागलं.
वेगवेगळ्या पक्षातले नेते फोडून पक्ष मोठा होत नाही. तर पक्षातल्या कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्ष मोठा होतो हे आता अजित पवारांनी समजून घेण्याची गरज आहे. मात्र हे त्यांना समजणार नाही. कारण हे त्यांच्या काकांनाही कधी समजलं नाही. ज्या पक्षाची निर्मितीच मुळात वेगवेगळ्या पक्षातून आयात केलेल्या नेत्यांच्या जीवावर झालेली आहे, तिथं या पेक्षा वेगळं काही घडण्याची अपेक्षाही ठेवण्याची गरज नाही.


या पराभवामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यशैलीत बदल होईल अशा भ्रमात विरोधी पक्षांनी राहू नये. याचा वचपा काढण्यासाठी आता आगामी काळात पुण्यात पुन्हा जातीय राजकारणाला वेग दिला जाईल. जेम्स लेन, दादोजी कोंडदेव या सारखे मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेटवले जातील. दादरचं चैत्यभूमी नामांतर करण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरेल. शिवशक्ती - भीमशक्तीमध्ये कशा प्रकारे विघ्न आणली जातील यासाठी विविध मुद्दे मांडले जातील. कारण शिवशक्ती - भीमशक्तीच्या जोरदार टोल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला घरातच तोंडावर आपटावं लागलं आहे.

आता शिवसेना, भाजप, रिपाइं या महायुतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीय राजकारणाला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न न सोडवता दलित समाजाला झुलवण्याचं काम काँग्रेसनं केलं होतं, हा इतिहास इथं विसरता येणार नाही. आता त्याच काँग्रेसमधून फुटून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेस जुना इतिहास साकारण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच सुचवलेला मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा पर्याय सरकारने स्वीकारला. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामविस्तार सर्व जनतेनं स्वीकारला. आता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीय राजकारणाला रोखण्यासाठी 'दादर चैत्यभूमी' असा नामविस्तार करण्यात काय हरकत आहे ?

Friday, September 2, 2011

ई टीव्ही : एक समृद्ध आठवण !

ई टीव्हीला सोनी टीव्ही समूह विकत घेणार असल्याची एक बातमी मागच्या महिन्यात चर्चेचा विषय झाली होती. अर्थात दूरचित्रवाहिन्यांच्या विश्वात व्यवहार आणि 'धंदे' काही नवीन नाहीत. मात्र ई टीव्ही विकली जाणार या बातमीनं अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्या या माध्यमातून सर्वांबरोबर पुन्हा जागवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तुम्ही सर्व तुमच्या कॉमेन्टस आणि ई मेलमधून अधिक माहिती कळवा, म्हणजे ती ही या ब्लॉगमध्ये समाविष्ट करता येईल.


हैदराबादच्या डेस्कवर मी 1 ऑक्टोबर 2004 ते 15 ऑक्टोबर 2006 पर्यंत काम केले. त्या आधी मी ई टीव्हीच्या प्रोग्रामींग डिपार्टमेंटमध्ये होतो. तिथल्या आठवणी नंतर कधी तरी मांडेन. मात्र प्रोग्रामींग डिपार्टमेंटमध्येच असताना संभाजीनगरचे शैलेश लांबे, प्रवीण अंधारकर यांच्याबरोबर ओळख झालेली होती. त्यामुळे न्यूज डिपार्टमेंटमध्ये येताना कोणताही नवखेपणा माझ्यात नव्हता.
डेस्कवर गेलो तेव्हा विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू होती. मी आणि राहुल वाघ एकाच दिवशी जॉईन झालो होतो. डेस्कवर चार जणांची एक टीम तयार करून प्रत्येकाकडे स्वतंत्र विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. मी, श्रीरंग खरे आणि केतकी मराठवाडा विभागातल्या बातम्यांवर नजर ठेऊन होतो. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत त्या विभागातले अपडेट्स देत राहण्याची ती कामाची पद्धत ठरवण्यात आली होती.
विधानसभा निवडणूक संपली आणि त्या नंतर सुरू झाली ती धमाल. दर दोन आठवड्यांनंतर न चुकता नाईट शिफ्ट लागायचीच. अर्थात थोडेफार अपवाद वगळून. मात्र आम्ही त्या रात्रींचा दिवस करून पार धमाल उडवून द्यायचो. आणि त्यातच नोव्हेंबर महिन्याच्या आसपास तीन - चार कॉपी एडिटर ( तरूणी ) डेस्कवर आल्या. मग काय सगळं वातावरणच बदलून गेलं.
नेहमीप्रमाणे आमच्या एका मित्राने ( इथं नाव देता येणार नाही.) उमेदवारी जाहीर केली. दुस-याने सर्वांनी विनंती करून स्वत:साठी एक 'मतदारसंघ' आरक्षित करून घेतला. तर दुस-या एका मित्रानं मेनअँक्टर ( एडिटिंग सॉफ्टवेअर ) शिकवण्याच्या प्रयत्नातून 'मासा' गळाला लागतो का ? याचा अंदाज घेतला.
याचवेळी गिरीश अवघडे आणि रमेश जोशी बरोबर मैत्री जमली. अर्थात डेस्कवर तेव्हाही गटबाजी आणि राजकारण होतं. मात्र आम्ही 'अलिप्त राष्ट्रांचे' प्रतिनिधी असल्याने आम्ही कोणत्याही गटाचं मंडलिकत्व पत्करलं नव्हतं. त्यामुळे हसतखेळत मजा करणे, आणि कामही करणे या पद्धतीने आमचे काम सुरू असायचे. 'फाईव्ह डेज वीक'चा आद्य प्रणेता म्हणजे गिरीश अवघडे. आठवड्यातल्या एका वीकली ऑफ बरोबर नियमीत एक दांडी मारून त्यानं फाईव्ह डेज वीकची बीजं रोवली. गिरीशचाच कित्ता पुढे चिन्मय काळे यानं सार्थपणे पुढे नेला. त्याचीही दर आठवड्याला एक दांडी चुकली नाही. नंतर हा चिन्मय बुलेटिन प्रोड्युसरही झाला होता.
नाईट शिफ्ट हा एक स्वतंत्र विषय आहे. आमच्या काही मित्रांना तर तीन - तीन महिने नाईट शिफ्ट लावण्यात आली होती. एखादा फार शहाणपणा दाखवत असेल, हुज्जत घालत असेल, प्रस्थापितांच्या गटाला जुमानत नसेल तर त्याच्यावर नाईट शिफ्टचं हत्यार उगारलं जायचं. जर नाईट टाळायची असेल तर मग गटबाजी करणे, हांजी हांजी करणे हे दुसरे मार्ग होते. अर्थात दुस-या मार्गानं जाणा-यांची संख्या फार जास्त होती. त्यामुळे लिडर हा स्वतंत्र बाण्याचा असणं किती गरजेचं आहे, हे लक्षात येतं.
बुलेटिन काढण्याची आशिष चांदोरकरची शैली सर्वात चांगली होती. कोणतंही टेन्शन न घेता तो बुलेटिन काढायचा. त्यामुळं हे तर सोपं काम असं वाटायचं. तर दुसरीकडे केतकी आणि नरेश बोभाटे ज्या पद्धतीनं बुलेटिन काढायचे ते पाहून काळजात धडकी भरायची. हे काम फार अवघड आणि कधीच जमणार नाही असं वाटायचं. धनंजय कोष्टींची शैलीही अशीच टेन्शन फ्री. गजानन कदम तर पीटीआय शिवाय दुस-या कोणत्याच बातम्यांना हात लावायचे नाही. तर डॉक्टर रेळेकर लाल रंगाचं स्वेटर घालून शिफ्टमध्ये आल्याबरोबरच बुलेटिन लावून टाकायचे. हळू हळू अवरली, आपली मुंबई या बुलेटिनपासून माझी सुरूवात झाली. नंतर वृत्तवेधही केलं. वृत्तवेध हे त्या काळात बुद्धिवादी बुलेटिन प्रोड्युसर्सचं काम मानलं जात होतं.
हिवाळी अधिवेशन जवळ आल्यावर डेस्कवर जबरदस्त लॉबिंग सुरू व्हायचं. अशोक सुरवसे सरांच्या नजरेत भरण्यासाठी प्रयत्न सुरू केले जायचे. राजकारणातला अभ्यास सर्वांना कळेल अशा पद्धतीनं मार्केटिंग केलं जायचं. त्यासाठी प्रत्येक ग्रुपचे काही फंडे होते. आपल्या गटातील एकेकाची स्तुती केली जायची. काही जण तर हातात तेलाची बाटली बुमप्रमाणे पकडून रूमवर पीटीसीची प्रॅक्टीस करायचे.
2005 ते 2006 या काळात डेस्कवर ख-या अर्थानं हुकूमत गाजवली ती चंद्रकांत फुंदेनं. मात्र तो बाबा या नावानं परिचित होता आणि अजूनही आहे बरंका. अर्थात या डेस्कवर माझं झालेलं 'गारू' हे नामकरण अजूनही कायमच आहे. इथं मुद्दा आहे तो बाबाचा. भडक डोक्याचा बाबा रोज वादळ निर्माण करायचा. सगळ्यांशी भिडायचाही. बरं त्याचा अविर्भावही 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' असाच होता. अर्थात हे वाचल्यानंतर त्याचा मला फोन येईल. 'ए गा-या माजला का xxx, पण तू चांगलं लिहतो रे', अशी कॉमेन्टही देईल. बाबाचा एक डायलॉग फेमस होता. तो म्हणजे, I dont like this. बाबा सारखाच योगेश बिडवई. आता तो अण्णा या नावाने ओळखला जातो. नवीन आलेल्या कॉपी एडिटरला प्रिन्टचा अऩुभव घ्या, असा सल्ला तो न मागता द्यायचा.
बाबा, अभिजित कांबळे, स्वप्नील बापट आणि रूपेश कलंत्री हे ज्या ठिकाणी रहायचे त्याचं नाव हवेली होतं. बरं हे चौघेही वेगवेगळ्या प्रवृत्तीचे. बाबा आणि अभिजित बुद्धिवादी. तर स्वप्निल आणि रूपेश कलाप्रेमी. या हवेलीवर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. त्यातला भेळीचा किस्सा प्रसिध्द आहे. अशाच कार्यक्रमांच्या दरम्यान स्वप्नील त्याच्या कविता ऐकवायचा. एक कप चहा आणि पोहे, यासाठी मीही त्या कविता ऐकायचो. नाही म्हणायला कधीकधी चांगल्या कविताही करायचा म्हणा. नाईट शिफ्टला रुपेशनं आणलेली शाल, अकरा ते एक ठरलेली झोप त्यानंतर पुन्हा साडेपाच ते सातची झोप कधीच चुकली नाही.
नंतरच्या काळात स्नेहा आणि सुप्रिया डेस्कवर आल्या. त्यामुळे डेस्कच्या सांस्कृतिक वैभवात अजूनच भर पडली.
डेस्क मीटिंग हा प्रकार म्हणजे झालेल्या चुकांचा आढावा, प्लॅनिंगचा आखाडा असायचा. चिकून गुनिया की चिकन गुनिया, करात की कारत या सारख्या विषयांवर तिथं किस पाडला जायचा. मेघराज पाटील अशा मीटिंगमध्ये त्यांचा मुद्दा कधीच सोडायचे नाहीत. आपल्या मुद्दावर ठाम राहणं, ही त्यांची खासियत. अशाच मीटिंगमधल्या एक'संघ' गुणांवरून राजेंद्र हुंजे एके दिवशी 'राजामाणूस' होणार हे सगळ्यांच्या लक्षात आलं होतं.
डेस्कवर काही राजकारणीसुद्धा होते. राजकारणातून पत्रकारितेत आलेला अनिल पवार आणि पत्रकारितेतून राजकारणात जाण्यासाठी इच्छूक असलेला धनंजय शेळके. दोघेही 'राष्ट्रवादा'ने ओतप्रोत भरलेले होते.
दर आठवड्याला येणारा टॅमचा रिपोर्ट डेस्कवर सगळ्यांना पाहण्यासाठी खुला असायचा. त्यामुळं कोणतं बुलेटिन कसं रेटिंग मिळवतंय, कुठे काम करण्याची गरज आहे, हे पाहता यायचं. लक्षात घ्या ही सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. या गोष्टी न्यूज चॅनेल्समध्ये आता होताहेत. यावरून ई टीव्ही काळाच्या किती पुढे होती, हे लक्षात येतं.
नाईट शिफ्टला मी, गिरीश रमेश आणि पॅनलला जर दीपक शितोळे, शिरीष जाधव असेल तर रात्रभर जोक्स, एकमेकांची खेचणे, सिगरेट याची बहार यायची. चहासाठी कुणाला तरी कटवावं लागायचं. अरे हो, पॅनलवरून आठवलं. आनंदी कुलकर्णीसमोर पॅनलवाले म्हटलं की, त्याचा शुद्ध सात्विक संताप व्हायचा. आणि मग तो म्हणायचा, हॅलो माझंही मास कॉम झालं आहे.
या सर्व गदारोळात तिथं साजरा होणार गणेशोत्सव मनाला आनंद देणारा ठरायचा. दहा दिवस आरती आणि नंतर आलमपनाहमध्ये पार्टी रंगायची. जोक्स, एकपात्री नाटक, फिश पॉण्ड्स आणि नंतर डान्स. असा कार्यक्रम असायचा. एकदा सर्वांना डान्सची प्रतीक्षा असताना मृदूला जोशी यांचं सतारवादन रंगलं होतं. मग सगळ्यांना टाळ्या वाजवाव्या लागल्या होत्या. कार्यक्रमांच्या वेळी माधुरी गुंटीचा उत्साहही मोठा असायचा. अशाच एका कार्यक्रमात 'अखिल भारतीय आंबट पक्ष' स्थापन झाला होता. आता त्याची शाखा आयबीएन लोकमत आणि पुण्यापर्यंत आहे. जिज्ञासूंनी जुन्या ई टीव्हीएन्सकडून त्यांची नावे घ्यावी. याच कार्यक्रमात सादर केलेली नक्कल तुफान हिट झाली होती. त्यानंतर आ आन्टे आमलापुरम, या गाण्यावर सगळा डेस्क थिरकला होता.
डेस्कवर डाव्यांचाही एक गट होता. मात्र त्यांची गटबाजी नव्हती. मेघराज पाटील, निमा पाटील, माणिक मुंडे हे डाव्या विचारांचे. त्यांचं ऐकायलाही मजा यायची. निमा आणि हृषीकेशची राजकीय जुगलबंदीही चांगलीच रंगायची.
सुनील बोधनकर आणि जयंत गायकवाड सारखे अंग्री यंग मॅनही डेस्कवर त्यांचा आब राखून होते. प्रवीण ब्रम्हपूरकर तर हृषीकेशचा मानसपूत्रच होता, म्हणजे अजूनही आहे.
अँकर होण्यासाठी तिथं सातत्यानं प्रयत्न सुरू असायचे. अर्थात माझाही होता. पण तू मराठवाड्यातला असं म्हणून तूझा उच्चार योग्य नाही. परिणामी मला साधा व्हीओ सुद्धा करू दिला जायचा नाही. ( आताही सिस्टीममध्ये फार काही फरक पडला नाही. असो.) आता मराठवाड्यातलाच असला तरी मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपुरेच राज्य करतोय. बरंय त्याला अजून या उच्चारवाल्यांनी घरी पाठवलेलं नाही. अशा प्रकारे एकमेकांचे पत्ते पद्धतशीरपणे दूर करण्यात काही सहकारी निष्णात होते.
मार्केटिंगच्या व्हॉईस ओव्हरसाठी सगळ्यांच्या उड्या पडायच्या. कारण खणखणीत शंभर रूपये मिळायचे. अभय जिन्सीवालेपण त्याचा व्हीओ करायचा. मार्केटिंग डिपार्टमेंटमधून फोन आल्यावर तो उचलून गुपचूपपणे पावले व्हीओ करण्यासाठी चालायची.
काही अँकर्सचे ऑन एअर किस्से अजूनही ताजे आहेत. एका अँकरने नियमभंग हा शब्द वाचताना विनयभंग असा वाचला होता. तर दुसरीने आगीचा अँकर असा काही वाचला होता की, विचारायची सोय नाही. तर तिसरीने कहरच केला होता. अडवाणींनी प्रयाण केलं, असं वाचण्याऐवजी पलायन केलं, असं वाचून मोठाच हादरा दिला होता.
मात्र सागर गोखले आणि मकरंद माळवेची बातच और. दोघांचा अभ्यास आणि शैली उत्तम. मात्र नवीन आलेल्या कॉपी एडिटर्सबरोबर दोघेही वरिष्ठ असतानाही चांगलं मार्गदर्शन करायचे. प्रसिद्धी या दोघांच्या डोक्यात गेलेली नव्हती. मकरंद माळवे यानं आणलेला कप अजूनही डेस्कवर जतन केल्याचं सांगण्यात येतंय. चहा शेअर करण्यासाठी कॅन्टीनवाला एक्सट्रा कप द्यायचा नाही. त्यामुळे मकरंदच्या सुपीक पुणेकरानं घरून हा कप आणला. पाच रूपयाचा चहा आणि कॉफी दोघांना यामुळे शेअर करता यायचा
मे 2005 हा डेस्कवर विवाहाचा महिना ठरला होता. हृषीकेश देशपांडे, मी, अभिजीत कांबळे, अभय हे सगळे एकाच महिन्यात विवाहबद्ध झालो होतो. पुढच्याच महिन्यात राहुल वाघचंही लग्न झालं होतं.
साहित्य संमेलन म्हणजे दुर्गेश सोनार हे समीकरण ई टीव्हीत पक्क होतं. त्याच्याही कविता उत्तरोत्तर रंगत जायच्या. महाराष्ट्र माझा हे बुलेटिन काढण्यात त्याची हातोटी होती. RO लॉक हा शब्दही तिथंच ऐकायला मिळाला. आता 24 तासच्या दुनियेत ही संकल्पना म्हणजे काही औरच.
ई टीव्हीचा इनपुट विभाग सर्वाधिक कार्यक्षम आहे. कारण तिथं दर महिन्याला एक - दोन स्ट्रिंजर तर तीन - चार महिन्याला एका रिपोर्टरचा राजीनामा ठरलेला असतो. तिथला 'कामाचा' झपाटा संशोधनाचा विषय आहे. इथल्या सारखे रिपोर्टर कुठेच काढले जात नाहीत. बहुतेक एचआर डिपार्टमेंटला काम मिळावं, यासाठी हा उद्योग असावा.

दूर मुलखात असलेले आम्ही सहकारी तिथं एकमेकांना आधार होतो. आता जवळपास सगळेच मुंबईत आहोत. मात्र या शहराने आमच्यातली मैत्री, स्नेह, जिव्हाळा ओरबडून घेतला आहे. मित्र आता जणू स्पर्धक झाले आहेत. तीन - तीन महिने कुणाचा फोन नसतो. मी भला माझं काम भलं, ही या शहराची जीवनपद्धती सगळ्यांनीच आत्मसात केली आहे. या शहराच्या वेगानं आपल्यातल्या जिव्हाळ्याला कधीच मागं टाकलंय. पण जिव्हाळा कायम ठेवायचा असेल तर एकमेकांना साद द्या. कारण या आठवणी, हे मित्र कधीच मिळणार नाहीत.

Friday, August 19, 2011

अण्णांचे आंदोलन, काँग्रेसचा आत्मक्लेश

अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मिळणा-या पाठिंब्यामुळे धास्तावलेल्या काँग्रेस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली. आणि त्यानंतर काँग्रेस सरकारचे सगळे निर्णयही चुकत गेले. अण्णा हजारेंना उपोषणाची परवानगी देण्यात आली नाही. जेपी पार्ककडे निघालेल्या अण्णांना अटक करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी त्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आंदोलनासाठी बिनशर्त अटींवर अडून बसलेल्या अण्णांनी तिहारमध्येच उपोषण सुरू ठेवलं. तर तिहारच्या बाहेर त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढत गेली. अखेर सरकारने अण्णांना रामलीला मैदानावर उपोषणाची परवानगी दिली. काँग्रेस सरकारमध्ये या मुद्यावर किती गोंधळ उडालेला आहे, आणि या सरकारने आत्मविश्वास गमावल्याचं या घटनाक्रमातून सिद्ध होतं.
अण्णा हजारेंवर बेछूट आरोप करण्याची काँग्रेसच्या चाणक्यांची नीती सपशेल फसली. मनीष तिवारींच्या बेताल वक्तव्यानंतर काँग्रेस बॅकफूटवर गेली. तर पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, अंबिका सोनी यांनीही त्यांच्या पातळीवर जितका गोंधळ उडवून देता येईल तितका उडवून दिला.
अण्णांच्या मागण्या मान्य होतील किंवा नाही, हा एक विषय आहे. मात्र इथं आपल्या चर्चा करायची आहे ती या मुद्यावर की, अण्णांना इतका पाठिंबा का मिळतोय ?
सामान्य नागरिकांचा विशेषत: तरूणांचा राजकीय पक्षांवरील विश्वास उडू लागला आहे का ? आणि जर याचं उत्तर होय असेल तर हा आपल्या लोकशाहीप्रधान देशाला धोकाच म्हणायला हवा. कारण आपल्या देशाचा जो काही विकास झाला आहे, तो याच पद्धतीतून झाला आहे. अर्थात देशाचं जे काही वाटोळं झालंय, तेही याच माध्यमातून झालंय हे ही नाकारता येणार नाही.
देशातल्या वाढत्या भ्रष्टाचारामुळं इथला तरूण व्यथित झालाय. सत्ताधारी भ्रष्टाचार संपवण्यासाठी नालायक आहेत. इतकंच नव्हे तर भ्रष्टाचा-यांना सरकारचा पाठिंबा आहे की काय ? असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी फक्त काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांनाच तुरूंगात टाकण्यात आलं. मात्र या भ्रष्टाचारात सामील असलेले त्यांचे वरिष्ठ कधी गजाआड होणार ? हा सवाल सामान्य जनतेच्या आणि तरूणांच्या मनात आहे.
सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, राजकीय नेत्यांची उघड होणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे यामुळे देशातला तरूण निराश झाला होता. ही परिस्थिती त्याला बदलायची होती. मात्र विरोधी पक्ष या प्रश्नावर रस्त्यावर उतरत नव्हते. या प्रश्नावर लढण्याची ताकद आणि ऊर्मीसुध्दा विरोधी पक्षांनी गमावली की काय ? असा सवाल उपस्थित होत होता.
नालायक सत्ताधारी आणि निष्क्रीय विरोधक यांच्यातली ही स्पेस अण्णा हजारेंनी भरून काढली. एकाचवेळी सत्ताधा-यांवर आसूड ओढत असतानाच त्यांनी विरोधी पक्षांची भूमिकाही पार पाडली. इंडिया अगेनस्ट करप्शन या संघटनेचीही अण्णांना चांगलीच साथ मिळत आहे. मीडियानेही हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय. अण्णांच्या आंदोलनाला मिळणा-या LIVE प्रसिद्धीमुळेही समाजात चांगलीच जनजागृती निर्माण होऊ लागली आहे. परिणामी अण्णांचे आंदोलन व्यापक होत चालले आहे. तर मधल्या मधे चुकीच्या निर्णयांमुळे काँग्रेसवर आत्मक्लेश करण्याची वेळ आली आहे.

Monday, July 25, 2011

द ग्रेट काँग्रेस सर्कस !

मणिशंकर अय्यर. काँग्रेस संस्कृतीत मुरलेल्या नेत्यांपैकी एक. मात्र आता त्यांच्यामुळं काँग्रेस मुख्यालयाच्या इमारतीची ओळखच बदलली गेली आहे. आता काँग्रेसचं मुख्यालय जणू काही सर्कसचा तंबू दिसायला लागलं आहे. याचं कारणही तसंच आहे. 'काँग्रेसमध्ये कुणाला पद मिळवायचं असतं, तर कुणाला पदाला मुकावं लागतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये अशा प्रकारे सर्कस सुरू असते', असं विधान मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे. बरं काँग्रेसच्या संस्कृतीचा आणि त्या पक्षाच्या इतिहासात पाहिल्यावर सर्कसमध्ये शोभावेत असे अनेक जोकर तिथं रूजले आणि चांगलेच फोफावलेसुद्धा. त्या जोकरांनी स्वत:चा विकास करून घेतला. मात्र त्यांच्या विदूषकी चाळ्यांमुळे देशाची स्थिती हास्यास्पद झाली.

काँग्रेसच्या सर्कशीचे रिंगमास्टर हे गांधी घराणं आहे. या रिंगमास्टरला खुश ठेवण्यासाठी सर्कशीतल्या प्राण्यांची आणि विदुषकांची कसरत सुरू असते. मग त्यातून कुणी 'इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा', असं विधान करण्यात धन्यता मानतात. एखादा छुटभैय्या नेता सोनिया गांधींनी पंतप्रधानपद स्वीकारावं यासाठी भर गर्दीत गाडीवर चढून डोक्याला पिस्तूल लावून फिरतो. सध्याचा लेटेस्ट विदुषक म्हणजे दिग्विजय सिंग. हा विदुषक सध्या बेफाम सुटला आहे. रिंगमास्टर सोनिया गांधी आणि ज्युनिअर रिंग मास्टर राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी त्यानी फक्त सुंता करून घेण्याचीच बाकी ठेवली आहे. आपल्या बेताल वक्तव्यांनी या विदुषकाने भारतीय राजकारणाचं जगात हसं करून ठेवलं आहे.

कलमाडींचा झाला गझनी

काँग्रेसच्या या सर्कसमधला आणखी एक कलाकार म्हणजे सुरेश कलमाडी. मात्र आता या कलमाडींना स्मृतीभंश झाला आहे. त्यांनी आतापर्यंत इतका भ्रष्टाचार करून ठेवला आहे की, त्यामुळे पैसे कुठेकुठे ठेवलेत हे लक्षात ठेवताना त्यांच्या बुद्धीवर ताण पडला. परिणामी या धक्क्यामुळं त्यांना स्मृतीभंश झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरेश कलमाडींचा भ्रष्टाचारच इतका व्यापक आणि चौफेर प्रमाणात होता की, त्याचा आकडा नेमका किती असावा यावरूनही अजून वाद आहे.


आता सुरेश कलमाडींना ते खासदार आहेत की नाही ? हे सुद्धा आठवत असेल का ? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांना हा आजार चार वर्षांपासून असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. दोनच वर्षांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी त्यांना स्मृतीभंश कसा झाला नाही. तेव्हा तर त्यांनी आठवणीने खासदारकीचं तिकीट घेतलं. आणि आत्ताच स्मृतीभंश झाल्याची बातमी येते, त्यावरून हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही, हे स्पष्ट होतं. 'सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी'ची ही नवी चाल असणार, यात फार जास्त शंका उपस्थित करण्याचं कारणच नाही.


सर्कशीतला पाहुणा कलाकार


काँग्रेसच्या या तंबूत सध्या पाहुणा कलाकार असलेल्या ए. राजानेही सध्या काँग्रेसचा चांगलाच बाजा वाजवला आहे. टू जी स्पेक्ट्रममध्ये केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी तिहार जेलमध्ये ए. राजा शिक्षा भोगत आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टात सुनावणीत दिलेल्या जबानीत ए. राजाने काँग्रेसचा भ्रष्ट बुरखा टराटरा फाडला. पंतप्रधानांच्या उपस्थितीत स्पेक्ट्रमचं वितरण केल्याची जबानी राजाने दिली आणि काँग्रेसच्या तंबूत दाणादाण उडाली. ए. राजाच्या जबानीनंतर थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. ए. राजाच्या जबानीवरून काँग्रेसही बॅकफूटवरू गेली आहे. एका आरोपीच्या मागणीवरून राजीनाम्याची मागणी करणं योग्य नाही, अशी भूमिका आता काँग्रेसने घेतली आहे.

चला, हे आघाडी सरकार सामान्य नागरिकाला सुखी ठेऊ शकत नाही. त्याला सुरक्षी देऊ शकत नाही. दहशतवाद्यांना रोखू शकत नाही. पण काँग्रेसच्या सर्कशीतले हे जोकर सामान्य नागरिकांचं मनोरंजन करण्यासाठी सक्षम आहेत, हे मान्य करावंच लागेल.

Friday, July 15, 2011

अजून किती सहन करायचं ?

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे खरोखरच धन्यवाद मानायलाच हवे. कारण 31 महिन्यांनंतर मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. 13 जुलै रोजी कसाबच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून दहशतवाद्यांनी डाव साधला, आणि कसाबला तीन बॉम्बची सलामी दिली. कसाबच्या वाढदिवसाच्या या जश्नमध्ये 18 मुंबईकरांना जीव गमवावा लागला, तर शंभरपेक्षा जास्त जणांना जखमी व्हावं लागलं. मात्र यात वाईट कशाला वाटून घ्यायचं ? देशाची धर्मनिरपेक्षता जपायची असेल तर असे क्रुरकर्मा अजमल कसाब, अफजल गुरू यांना जपायलाच हवं. आज तर गुरूपोर्णिमा आहे. केंद्र सरकारनं आजच्या मुहूर्तावर अफजल गुरूचं एखादं पोस्टाचं तिकीट का प्रकाशित केलं नाही ? हा माझ्यासारख्या धर्मनिरपेक्ष देशातल्या सामान्य नागरिकाला प्रश्न पडला आहे.
आताच थोड्या वेळापूर्वी ऑफिसमध्ये माझा एक सहकारी अमर काणे यानं एक मत व्यक्त केलं. ते मत म्हणजे सामान्यांच्या मनात किती संताप खदखदतोय याचंच एक प्रातिनिधीक चित्र आहे. मुंबईतल्या एखाद्या चौकाला कसाबचं नाव द्यायला हवं, असं माझ्या मित्रानं सांगितलं. नाही तरी अजून कसाबला फासावर लटकवलेलं नाही. त्यामुळं या काँग्रेसच्या जावयाचे लाड करायलाच लागतील. खाली दिसणा-या या छायाचित्रातल्या सामान्य नागरिकांना अश्रू ढाळावेच लागतील.

मात्रं हे अजून किती दिवस सहन करायचं ? कोणी पेरले मुंबईत तीन बॉम्ब ? किती जणांच्या स्लीपर सेलनं केलं हे कृत्य ? 'दहशतवादाला धर्म नसतो' हे वाक्य किती दिवस ऐकायचं. जर दहशतवादाला धर्म नसतो तर मग भेंडी बाजारात का होत नाहीत बॉम्बस्फोट ? ज्या धर्मांध मुस्लिमांना जगावर इस्लामचं राज्य आणायचं आहे, ते सांगून सवरून धर्मासाठीच हिंसाचार घडवत आहेत. आणि आपले काँग्रेसी राज्यकर्ते कशाला आणि कशाच्या आधारे म्हणतात की दहशतवादाला धर्म नसतो. मतांसाठी लाचार झालेल्यांना धर्म नसतो. तसाच या काँग्रेसवाल्यांना कोणताही धर्म नाहीच.
या शहरावर अंडरवर्ल्डचं राज्य आहे. दहशतवादीही त्यांना सामील झाले आहेत. अंडरवर्ल्ड म्हणजे मुस्लिम गुन्हेगारांचच या शहरावर राज्य आहे. दहशतवादी संघटनांचे स्लिपर सेल इथल्या मोहल्ल्यांमध्ये आहेत. दहशतवाद्यांना साथ देणारी सापांची हिरवळ या शहरातच नव्हे तर देशभरात आहे, हे सांगण्यासाठी कुणाच्याही साक्षीची गरज नाही. मात्र ही हिरवळ ठेचून काढण्याची हिंमत देशातल्या आणि राज्यातल्या राज्यकर्त्यांमध्ये आहे का ?


यांच्या मतांच्या राजकारणासाठी सामान्यांनी किती दिवस मरायचं ? सामान्यांनी काय फक्त मरणातच जीवन अनुभवायचं ? देशात सुरक्षा नावाची कोणतीच चीज अस्तित्वात नाही. गुन्हेगारांना पकडायचं म्हटलं तर पोलिसांचे हात जातात ते मोहल्ल्यात. आणि तिथं कुणाच्या दाढीला स्पर्श झाला म्हणजे यांचा 'इस्लाम खतरे में' यायचा आणि काँग्रेसची सत्ताही खतरे में. त्यामुळं काँग्रेस आणि धर्मांध मुस्लिमांचं असं साटंलोटं जमून आलं आहे. देशावर असलेलं इस्लामी दहशतवादाचं संकट दिवसेंदिवस गडद हिरवं होत चाललं आहे. भ्रष्टाचारानं बरबटलेलं आणि मुस्लिमांचं फक्त मतांसाठीच अनुनय करणा-यांचं सरकार सत्तेत असे पर्यंत हे सहन करावंच लागेल.

Sunday, June 12, 2011

दलित मतांसाठी राष्ट्रवादीचा 'सनद'शीर मार्ग

शिवशक्ती - भीमशक्तीचा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगलाच धसका घेतल्याचं आता स्पष्ट होतंय. 9 जूनरोजी चैतन्यमय वातावरणात शिवशक्ती - भीमशक्तीचा महामोर्चा आझाद मैदानात पार पडला. दुस-याच दिवशी सोमय्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसनं सामाजिक परिवर्तन हक्क परिषद आयोजित केली होती. शिवशक्ती - भीमशक्तीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस कशी धास्तावली, आहे हेच यातून दिसून येत होतं.
'गेल्या घरी सुखी रहा' असा एखाद्या वधू पित्यानं टाहो फोडावा त्या स्वरात शरद पवारांनी त्यांचं मत व्यक्त केलं. रामदास आठवलेंना धर्मनिरपेक्षतेची आठवण करून देण्यात येत होती. हे कमी की काय ? म्हणून शरद पवारांनी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांमधील 1 ते 8 प्रतिज्ञा वाचून दाखवल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाया खालील वाळू किती सरकू लागली आहे, हेच त्यांच्या या कृतीतून स्पष्ट झालं.

छगन भुजबळांनी त्यांच्या बाटग्या निष्ठा किती श्रेष्ठ आहेत हे दाखवण्यासाठी शरद पवारांना थेट फुले, शाहू, आंबेडकरांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करून शरद पवारांनी सत्ता पणाला लावली, असंही भुजबळ म्हणाले. 1978 साली विधानसभा आणि विधानपरिषदेत मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव एकमतानं संमत करण्यात आला होता. हा ठराव संमत झाल्यानंतर मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी दलित वस्त्यांवर काँग्रेस नेत्यांनी हल्ले केले होते. कित्येक दलितांच्या झोपड्या बेचिराख करून टाकण्यात आल्या होत्या. 1978 साली संमत झालेला ठराव प्रत्यक्षात येण्यासाठी 1994 साल उजाडावं लागलं. 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, असा नामविस्तार करण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुचवलेला नामविस्ताराचा पर्याय सर्वांच्या पसंतीला पडला. नामविस्तारामुळं आणि शिवसेनेच्या भुमिकेमुळं 1978 सारखी परिस्थिती मराठवाड्यात उदभवली नाही. राज्यकर्ते म्हणून शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी नामांतर, नामविस्तार याचं श्रेय नक्कीच घ्यावं. पण हे श्रेय त्यांनी आधी नव्हे तर शेवटी घ्यायला हवं. कारण 1978 मध्ये झालेला ठराव प्रत्यक्षात साकारण्यासाठी तब्बल 16 वर्ष त्यांना लागली. या मधल्या काळात दलित संघटनांना मोठा संघर्ष करावा लागला. कित्येक मोर्चे, बंद घडवावे लागले. दलित कार्यकर्त्यांना लाठ्या-काठ्या झेलाव्या लागल्या. कित्येकांना तुरूंगवास घडला. याच आंदोलनातून रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, गंगाधर गाडे असे कित्येक नेते घडले.

दलित चळवळीचं केंद्रबिंदू ठरलेल्या संभाजीनगरात नामांतरासाठी कित्येक मोर्चे निघाले. रिपब्लिकन पार्टीच्या कोणत्याही गटाचा मोर्चा असला तरी नागरिक त्यात सहभागी होत होते. एक दिवसाच्या ओल्या बाळंतणीपासून तर नव्वद वर्षांच्या वृद्धापर्यंतची रस्त्यावर उतरलेली आंबेडकरी जनता संभाजीनगरनं पाहिलेली आहे. तब्बल 16 वर्ष दलित जनतेनं नामांतरासाठी लढा दिला. त्यामुळं शरद पवार आणि छगन भुजबळ नामांतराचं पहिलं श्रेय तुमचं नव्हे तर, या लढाऊ दलित जनतेचं आहे. जी एक दिवसाची ओली बाळांतिण माता रस्त्यावर उतरली तिचं ते श्रेय आहे. काँग्रेसवाल्यांनो, जर इतकंच श्रेय घ्यायची हौस होती तर मग 1978 मध्येच नामांतर का केलं नाही ?

आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसला दलित मतदारांना आपल्याकडं आकृष्ट करण्यासाठी सनद जाहीर करण्याची वेळ आली आहे. मागील साठ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि काँग्रेसमधून फुटून निघालेल्या नकली काँग्रेस अर्थात एनसीपी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसनं ते अपयशी ठरल्याचंच मान्य केल्याचं स्पष्ट होतंय. मागील साठ वर्षात दलितांबरोबर बनवाबनवी केली, मात्र त्यांचा विकास घडवून आणण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीला करता आलं नाही. दलितांची मतं घेऊन काँग्रेसी राज्यकर्ते कायम सत्तेत राहिले. पण दलित जनतेला सत्तेत मतांच्या प्रमाणात वाटा कधीच मिळाला नाही. दलितांच्या मतांची रसद

घेणा-यांना आता सनद आठवली आहे. मात्र ही सनद फक्त सत्ता आणि मतं मिळवण्यासाठीच आहे, हे ही तितकंच खरं आहे.

त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा हा सनदशीर मार्ग किती फसवा आहे, हे दलित जनतेच्या लक्षात आलं आहे. आगामी काळात शिवशक्ती आणि भीमशक्तीचाच पर्याय सशक्त करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जातीय राजकारण गाडून टाकण्याची संधी जनतेसमोर निर्माण झाली आहे.

Tuesday, June 7, 2011

ही चित्रं पहा आणि मग बोला...

दिग्विजय सिंह सोनियाजींचा हा डान्स बघितला. मग आता काँग्रेसही नाच-यांचा पक्ष आहे, असंच तुम्हाला म्हणायचं आहे का ?

Friday, June 3, 2011

अजित पवार का बिथरले ?

शिखर बँकेला जमीनीवर आणण्याचा पराक्रम करणारा शरद पवारांचा पुतण्या अजित पवार याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गरळ ओकली. टू जी स्पेक्ट्रम, लवासा, पुण्यातील जमीन, शाहीद बलवा, कारखान्यांना पॅकेजेस देऊन ते खाणे, सहकार बँक बुडवणे अशी भ्रष्टाचाराची जंत्रीच पवार आणि कंपनीच्या मागे लागली आहे. त्यामुळे या सर्वांना फाटा देण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच अजित पवारांनी ही गरळ ओकल्याचं स्पष्ट होतंय.
तसंच शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राज्याच्या पटलावर झालेला उदय, यामुळे ही दलित मतांना गृहित धरणा-या अजित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची टगेगिरीच बंद होणार आहे. त्यामुळं अजित पवार आणि कंपनी दिवसाढवळ्या बरळू लागली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या संस्था काढल्या ? असा त्यांचा सवाल होता. मात्र हा सवाल विचारण्याची वेळ त्यांच्यावर का आली ? कारण पवार आणि कंपनीनं काढल्या सगळ्या संस्था, त्यांच्या ताब्यात असलेली बँक आता डबघईला आली आहे. सर्व साखर कारखाने कोट्यवधींचे पॅकेज देऊनही तोट्यात चालले आहेत. मात्र मिळालेल्या पॅकेजच्या जोरावर राष्ट्रवादीचे जिल्ह्या जिल्ह्यातील सरंजामदार गब्बर होत चालले आहेत. जनतेला हा सर्व भ्रष्टाचार दिसू लागला आहे. जनता राष्ट्रवादीच्या विरोधात चिडली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते स्वत: शेण खाऊन दुस-याचं तोंड हुंगत आहेत.
सोनिया गांधींच्या परदेशीपणाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. मात्र स्थापना झाल्यापासून हा पक्ष सोनिया गांधींच्या पदराचा आश्रय घेऊन राज्यात सत्तेत आहे. म्हणजे सोनिया गांधींनी विरोधही करायचा, त्यांच्या पदराखाली राहून सत्तेची मर्दूमकी गाजवायची असा या राष्ट्रवादींचा 'पुरूषार्थ' आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना प्रत्येक जिल्ह्यातील कारखानदार, सरंजामदार अशी मंडळी हाताशी धरली. या मंडळींनी पोसण्यासाठी त्यांच्या कारखान्यांना पॅकेज दिली. त्यातून राष्ट्रवादी मंडळी गब्बर झाली. कारखाने तर त्यांनी खाल्लेच, सहकारी बँकही बुडवली. आता हिच मंडळी खाजगी साखर कारखाने काढत आहेत. म्हणजे जनतेचा पैसा लुटणारी आणि सरकारला ठेंगा दाखवणारी ही राष्ट्रवादीची नेते मंडळी किती निर्लज्ज आहे, हेच यातून दिसून येतं.
फक्त मराठ्यांचा पक्ष असा, नावलौकिक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळांची केविलवाणी अवस्था झाली आहे. फक्त शरद पवारांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री व्हायचं म्हणून कोणतीही 'टाळी' न वाजवता भुजबळांना ते 'माळी' आहेत म्हणून हटवण्यात आलं. आणि हेच नेते जातीयवादाच्या विरोधात बोलतात तेव्हा जनतेची फुकटात करमणूक होते. भ्रष्टाचारात बरबटलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची ही टगेदारी सहकार क्षेत्रात सुरू ठेवावी. शिवसेनाप्रमुखांवर चिखल उडवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.

Monday, May 2, 2011

असाच दफनावा लागतो दहशतवाद !

ओसामा बिन लादेनला अखेर अमेरिकेने जलसमाधी दिलीच. अमेरिकेवर हल्ला करणा-या ओसामा बिन लादेनला त्याच्या पापाची शिक्षा अमेरिकेने दिली. अमेरिकेला जगातलं बलाढ्य राष्ट्र का म्हणतात ? त्याचीच प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा जगाला आली. दहशतवाद हा कसाब सारख्या अतिरेक्यांना बिर्याणी खाऊ घालून, पाकिस्तानसारख्या बिनडोक राष्ट्राबरोबर शांततेच्या चर्चा करून संपवता येत नाही. अतिरेक्यांना बिर्याणी नव्हे तर ओसामाला जशा मस्तकात गोळ्या घातल्या तशाच गोळ्या घालून संपवावा लागतो.
ओसामा बिन लादेनला ठार केल्याची बातमी जगभरात सगळ्यांना सुखावून गेली. दहशतवादाचा चेहरा आणि क्रूरकर्माच अमेरिकेने गाडून टाकला. जगभरात अल कैदा आणि दहशतवादी हल्ल्यांनी पोळलेल्या नागरिकांच्या जखमेवरच जणू काही फुंकर मारली गेली.
11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला म्हणजे अमेरिकेच्या स्वाभिमानावरील हल्ला होता. त्याच क्षणी अमेरिकेनं ओसामाला जिवंत किंवा मृत पकडणारच असं जाहीर केलं होतं. दहा वर्ष ओसामाला शोधण्यासाठी अमेरिकेनं जंगजंग पछाडलं. अफगाणिस्तानातल्या पर्वातांच्या रांगा पालथ्या घातल्या. या सर्व काळात लादेन पाकिस्तानातच असल्याचाही सगळ्यांचा संशय होता. कारण पाकिस्तान म्हणजे 'दहशतवादाची मक्का'च आहे. अखेर हा 'दहशतवादाचा हाजी' त्याच मक्केत सापडला. 'लादेन पाकिस्तानात नाही', असं सांगणा-या पाकिस्तानचं नसलेलं नाक पुन्हा एकदा कापलं गेलं.
जगातला आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असल्याचा पुरावा अनेकदा हिंदूस्थाननं दिलाय. मात्र नेहमी प्रमाणे 'लांड्या' बुद्धीच्या पाकिस्ताननं सर्व पुरावे नाकारले.
'लादेनच्या दफनविधीसाठी कोणत्याही देशानं जमीन दिली नसती' , असं कारण सांगत अमेरिकेनं त्याला जलसमाधी दिली. ( मालेगाव आणि मिनी पाकिस्तानातल्या धर्मांध मुस्लिमांना अमेरिकेचं हे म्हणनं पटलं असेल का ?) कारण लादेनची कबर खणली असती तर त्याचं उदात्तीकरण होण्याचाही धोका होता, असा त्यामागचा उद्देश असल्याचंही अमेरिकेनं स्पष्ट केलं.
आणि अमेरिकेचा हेतू किती खरा आहे, याचा पुरावा आपल्याच राज्यात आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाला याच मातीत पुरलं. स्वराज्यावर चालून येणा-यांची अशीच गत होईल असा संदेशच त्यांनी दिला. शिवाजी महाराजांनी 'वैरी मेला वैर संपले' या न्यायानं अफजल खानाची कबर बांधली.

मात्र आता प्रतापगडाच्या खाली काय दिसतं ? अफजल खानाच्या कबरीचं धर्मांध मुस्लिमांनी काँग्रेसच्या राजवटीत उदात्तीकरण केलं. मात्र हा धोका अमेरिकेच्या वेळीच लक्षात आला. आणि हे एका अर्थानं चांगलंही झालं, असंच म्हणावं लागेल. नाहीतर लादेनच्या कबरीवर फुलं वाहण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी त्यांच्या मागेमागे मनमोहन सिंह आणि युपीएचं शिष्टमंडळ नक्कीच पोचलं असतं. अनेक धर्मांध मुस्लिमांनाही लादेनच्या कबरीचा उमाळा आला असता. त्या धर्मांधांच्या सोयीसाठी हज यात्रेप्रमाणं विमान प्रवासासाठी अनुदानही देण्यात आलं असतं. हे असं घडलंच असतं. कारण काँग्रेसच्या मुस्लिम प्रेमाचा इतिहास सगळ्यांच्या परिचयाचा आहे.
अमेरिकेनं दहशतवादाचं धड वेगळं केलंय. आता दहशतवादाचे जगभरात पसरलेले अवयवही छाटून टाकावे लागतील. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला, संसदेवर झालेला हल्ला, देशाच्या अनेक भागात सातत्यानं होणारे हल्ले, काश्मीरमधल्या कारवाया असे अनेक हल्ले आपण पचवले आहेत. अजमल कसाब, अफजल गुरू यांना तरीही जिवंत ठेवण्यात आलं आहे. कारण आपल्या देशात नेभळटांचं सरकार आहे. त्यामुळं दहशतवादाच्या विरोधात लढण्याची आणि दहशतवाद्यांना गोळ्या घालण्याची शक्तीच या सरकारमध्ये नसल्याचं स्पष्ट होतं.
अमेरिका, तू दहशतवादाला दफन केलं. आमच्या देशावर चालून आलेले दहशतवादी कधी दफन होणार ? हाच सवाल आता सर्व देशवासियांच्या मनात आहे.

Friday, April 29, 2011

बांग्लादेशात हिंदूंवर बलात्कार, पाकिस्तानात हिंदूंना जाळले, पण प्लीज थंड बसा !

धर्म ही अफूची गोळी आहे. आणि हे वरील चित्र ते दाखवून देण्यासाठी पुरेसं आहे. मात्र या अफूच्या गोळीचं ज्यांना व्यसन लागलं आहे, त्यांचं हे व्यसन दूर कसं करायचं ? यावर काही गोळी आहे का ? कारण या आपल्या निधर्मी देशात सिंगल कॉलम छापून आलेल्या दोन बातम्यांचा परामर्श या लिखाणात घेतला आहे. बांग्लादेशमध्ये हिंदूंवर रोजच अत्याचार होतात. राजरोसपणे हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार केला जातो. हिंदूंना रोजच मुस्लीमांचा मार खावा लागतो. खाली दिलेलं हे बांग्लादेशमधल्या मुस्लिमांच्या अत्याचाराचं चित्र या साठी पुरेसं आहे. http://hindubd.blogspot.com/ वर हिंदूंची बांग्लादेशमध्ये काय स्थिती आहे, हे नमूद करण्यात आलं आहे.

२००१ च्या निवडणुकीनंतर शेकडो हिंदू स्त्रियांवर बांग्लादेशमध्ये बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात ए इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी बलात्कार केल्याचा सरकारी आकडा आहे. आपल्याकडे ही सिंगल कॉलम बातमी आता छापून आली आहे. मात्र ती बातमी वाचून प्लीज कोणीही पेटून उठू नका. कारण अत्याचाराचा हा पाढा काही अजून संपलेला नाही. हिंदू मुलींवर बलात्कार करून त्यांना मुस्लिम होण्यासाठी भाग पाडलं जात आहे. दिवसाढवळ्या हिंदूंची मंदिरं लूटली जात आहेत. वर दिलेल्या ब्लॉगमधील कॉमेन्टस वाचा, हिंदूंनी कसा तिथं टाहो फोडला आहे, ते हिंदूस्थानकडून मदतीची अपेक्षा करत आहेत हे दिसून येतं. हिंदू आणि बौद्धांच्या श्रद्धास्थानांना तिथं मातीत मिळवलं जात आहे. बांग्लादेशमधला वरती लिंक दिलेला ब्लॉग १० जानेवारी २०११ रोजी अपडेट झाला आहे. त्यानंतर म्हणजे आजपर्यंत साडेतीन महिन्यात तो अपडेट झालेला नाही. कुणास ठाऊक तो ब्लॉग लिहणारा मुस्लिमांच्या हातून तर मारला गेला नसेल ना ? अशी भीती वाटतेय.


वरती जळणारी ही बस पहा. ही जळणारी बस नव्हे तर हिंदूंची पाकिस्तानातली चिता आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशातले हिंदू काय मुस्लिमांच्या हातून मरायलाच जन्माला आले आहेत का ? पाकिस्तानातल्या बलुचिस्तानातल्या क्वेटामध्ये प्रवास करणा-या हिंदूंची बस चार सशस्त्र मुस्लिमांनी अडवून ती पेट्रोलनं पेटवून दिलं. त्यात सात चिमुकल्यांसह पंधरा जणांचा मृत्यू झाला. थांबा, शांत व्हा, रक्त उसळू देऊ नका. कारण अत्याचाराची मालिका अजूनही संपलेली नाही. बलुचिस्तानमध्येही हिंदूंची हत्या, मुलींना पळवून नेऊन त्यांना मुस्लिम करणे, बलात्कार करणे या घटना सुरू आहेत. अतिरेकी आणि धर्मांध मुस्लिम कधी हल्ला करतील याचा नेम नाही. तिथल्या सरकारी आकड्यानुसार 2010 या वर्षात 291 हिंदूंचं अपहरण करण्यात आलं. शेवटी हा सरकारी आकडा. त्यातले कित्येक परत आलेच नाहीत. अनेकांना मोठी रक्कम देऊन सोडवून आणावं लागलं.

बांग्लादेश आणि पाकिस्तानातल्या हिंदूंना किती दिवस आपण मरू देणार आहोत ? त्यांनाही जगायचं आहे. मात्र तिथले मुस्लिम त्यांना जगू देणार नाहीत. हिंदू माता - भगिनींची दिवसाढवळ्या विटंबना तिथं सुरूच राहिल. 'आम्हाला हिंदूस्थानात येऊ द्या' असा टाहो बांग्लादेश आणि पाकिस्तानातल्या हिंदूंनी फोडला आहे. अरे निधर्मी सरकारच्या षंढांनो तुमच्या कानावर हा टाहो पडत नाही का ? आपल्या हिंदू बांधवांवरील हा अत्याचार थांबवावा असं तुम्हाला वाटत नाही का ?

सरकार म्हणून तुम्हाला जरी काही वाटत नसलं तरी ते आमचे रक्ताचे हिंदू बांधव आहेत. नाही तरी देशात रोज बांग्लादेशी मुस्लिमांची घुसखोरी, पाकिस्तानातून अतिरेक्यांची घुसखोरी सुरूच आहे. कोट्यावधी बांग्लादेशी मुस्लिम हिंदूस्थानात सुखाने जगत आहेत. मग आपल्या रक्ताच्या हिंदूंना आपल्यात सामावून घेणं काहीच अवघड नाही. पाकिस्तान आणि बांग्लादेशातल्या हिंदूंना त्यांच्या स्वत:च्या हिंदूस्थानात आसरा द्या. पाकिस्तान आणि बांग्लादेशातल्या नागरिकांना अल्पसंख्यक हिंदू नको आहेत. चालेल आम्ही आमचे हिंदू आमच्या देशात सामावून घेतो. तुम्ही तुमचे मुसलमान तुमच्या देशात सामावून घ्या. आता आहे का काही उत्तर लांड्यांनो...बांग्लादेश आणि पाकिस्तानातल्या.

http://www.thereligionofpeace.com/ या वेब साईटवर मुस्लिम अत्याचाराच्या जगभरातल्या अधिक छळ कथा वाचा.

Friday, April 8, 2011

नेतृत्व नसलेल्या समूहाचा नेता आणि मीडिया

देशाचा सर्व मीडिया सध्या अण्णामय झाला आहे. युपीए सरकारचा माजच अण्णांनी उतरवल्याचं स्पष्ट झालं आहे. कपिल सिब्बल, प्रणव मुखर्जी यांना नाक घासत अण्णांसमोर जावं लागलं. सोनिया गांधींनीही त्यांना उपोषण मागं घेण्याची विनंती केली. पण आपल्या मागणीवर ठाम असलेल्या अण्णांनी काँग्रेसी नेत्यांची मागणी धुडकावून लावली. समितीत दोन अध्यक्ष आणि दोन्ही पक्षांचे पाच सदस्य असावे ही मागणी त्यांनी कायम ठेवली आहे. मात्र सरकारसमोर झुकणार नाही असं स्पष्ट करताना देशातल्या नागरिकांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या भावना किती तीव्र आहेत, हेच या घटनाक्रमातून दिसून येत आहे. जंतरमंतरवर जमलेली गर्दी, मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेलं उपोषण या सह देशभरात अण्णांना पाठिंबा देण्यासाठी 'आम आदमी' उत्सफूर्तपणे रस्त्यावर उतरला आहे. ही काही काँग्रेसच्या सभेला जशी भाड्यानं माणसं आणावी लागतात तशी गर्दी नाही. हा नागरिकांच्या मनात भ्रष्टाचाराविषयी असलेला राग आहे, तो व्यक्त करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. देशात सुरू असलेली भ्रष्टाचाराची मालिका पाहून नागरिकांच्या मनात संताप निर्माण झाला होता. पण नागरिकांचा राजकीय पक्षांवरील विश्वास कमी होत चालला आहे, हे कटू सत्यही या निमीत्तानं अधोरेखीत झालं. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची घोषणा राजकीय पक्षांनी केली, पण त्यांना नागरिकांचा पाठिंबा मिळू शकला नाही. कारण आता राजकीय नेत्यांची भ्रष्टाचारांमुळं पत घसरली आहे. लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी उपोषणाची घोषणा करून, उपोषणला सुरूवात करताच देशभरातल्या नागरिकांना नेतृत्व मिळालं. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांचा संताप व्यक्त करण्यासाठी त्यांना एक माध्यम मिळालं. भ्रष्टाचाराच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे लढणा-या नागरिकांना त्यांच्या समूहांना अण्णा हजारेंच्या माध्यमातून एक नेता मिळाला.


हिंदी, इंग्रजी आणि मराठी इलेक्ट्रॉनिक मीडियानं या जनआंदोलनाची जोरकस नोंद घेतली. बीबीसीनंही हे आंदोलन वेगळं रसायन असल्याचं स्पष्ट केलं. इजिप्त, लिबियानंतर आता भारताचा नंबर तर नाही ना ? या शंकेनं भ्रष्टाचारी नेत्यांना धडकी भरली. पण काही (विकलेले) पत्रकार, वृत्तपत्रं यांना जनतेची नाडी कळालीच नाही. अण्णांच्या आंदोलनाला आततायीपणा संबोधण्यात आलं. निवडणुकीच्या काळातच असणारा पेड न्यूजचा प्रकार आता रोजच्या बातम्यांमध्येही येऊ घातला आहे की काय ? अशी शंका आता येत आहे. कारण बातमीत बातमी न राहता मत प्रदर्शित होऊ लागलं आहे. काही (सुपारीबाज) पत्रकारांनी हे आंदोलन म्हणजे सेलिब्रिटींची प्रसिद्धीसाठीची धडपड, मेणबत्त्यावाल्यांचा स्टंट अशा प्रकारे बातम्या दिल्या आहेत. पॅकेज पत्रकारिता करणारे पत्रकार या घटनेमुळं उघडे पडत आहेत. अण्णांच्या आंदोलनाला वेगळं वळण देण्यासाठी त्यांना नेहमीप्रमाणं पॅकेज दिलं जात असेल अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.

नेतृत्व नसलेल्या समूहाला अण्णांच्या रूपानं नेता मिळाला. पण ज्यांच्याकडं समाजाला दिशा देण्याची जबाबदारी आहे अशा काही अपवादात्मक माध्यमांनी बातम्यांचा धंदा मांडला आहे. त्यामुळं अशा पोटार्थी माध्यमं आणि पत्रकारांचीही पत आगामी काळात रसातळाला जाईल यात शंका नाही.

Wednesday, April 6, 2011

विश्वविजेते आणि 'लांड्या' मनाचा आफ्रिदी

2 एप्रिल 2011 रोजी टीम इंडियानं श्रीलंकेवर मात केली. आणि टीम इंडिया विश्वविजेता बनली. त्या आधी झालेल्या पाकिस्तान बरोबरच्या लढतीतही विजय मिळवला. या मॅचनंतर आफ्रिदीनं, टीम इंडियानं चांगली कामगिरी केल्याचं सांगितलं. टीम इंडियाचा खेळ सरस असल्यानं बेस्ट टीम जिंकली अशी, प्रतिक्रिया व्यक्त करून त्याच्यातली खेळ भावना दाखवून दिली. टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात सर्वत्र जल्लोष सुरू होता. आणि या जल्लोषाच्या वातावरणातच भारतीयांच्या मनाला छेद देणारी प्रतिक्रिया पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीनं व्यक्त केली. मात्र पाकिस्तानात गेल्यावर त्यानं त्याची एक'जात' प्रतिक्रिया थेट बदलून टाकली. मुस्लिम आणि पाकिस्तानातल्या नागरिकांप्रमाणं भारतीय नागरिकांचे 'दिल बडा नहीं', अशी प्रतिक्रिया त्यानं व्यक्त केली. अर्थात त्यावर वादंग उठल्यानंतर, माझ वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आल्याची उलटी बोंब त्यानं ठोकली.
अरे, आफ्रिदी तुझ्या देशात जितके मुस्लिम राहतात त्या पेक्षा जास्त मुस्लिम या देशात राहतात. तुझ्या देशात अल्पसंख्याक असणा-या हिंदू आणि ख्रिश्चनांना कशी वागणूक मिळते ? युसूफ योहन्ना हा एकेकाळचा ख्रिश्चन महंमद युसूफ का झाला ? कारण तो जर महंमद झाला नसता तर 'साफ' झाला असता. तुझ्या देशातला अतिरेकी अजमल कसाब. शेकडो निष्पाप नागरिकांचे प्राण घेऊनही अजून जिवंतच आहे. त्याला आम्ही बिर्याणी खाऊ घालतो. आमच्या राज्याचे गृहमंत्री तुरूंगात जाऊन 'कैसे हो कसाब ?' अशी विचारणा करतात. ते ज्या खात्याचे मंत्री आहेत ते पोलीस राजरोस रस्त्यावर खंडण्या उकळतात, आमदाराला मार - मार मारतात. त्या आमदारांची गृहमंत्री कधी चौकशी करत नाहीत. पण कसाबची चौकशी करतात. या पेक्षा आणखी कोणता दिलदारपणा आफ्रिदीला हवासा वाटतो ?

पाकिस्तानातून अतिरेकी अव्याहतपणे काश्मीरमध्ये घुसतात, देशभरात त्यांच्या अतिरेकी कारवाया सुरू असतात तरी भारतानं कधी पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही. अरे आफ्रिदी हा दिलदारपणा तुला कसा दिसत नाही ?

Wednesday, March 30, 2011

पाकिस्तानचा पाडाव, आता लक्ष्य लंका दहन

वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार समजल्या जाणा-या टीम इंडियानं अपेक्षेप्रमाणं पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला. टीम इंडियानं आता फायनलमध्ये प्रवेश केलाय. वीरेंद्र सेहवागचा धडाका पाहता टीम इंडिया 300 पेक्षा जास्त धावा करणार असं वाटत होतं. मात्र मधली फळी अपेक्षीत कामगिरी करू शकली नाही. त्यामुळं टीम इंडिया 260 धावा करू शकली. सहा जीवदान मिळूनही सचिन तेंडूलकरला सेंच्युरीची सेंच्युरी करण्यात अपयश आलं. आता मुंबईत होम ग्राऊंडवर सचिन शतक ठोकून वर्ल्ड कप जिंकून देईल अशी खात्री वाटतेय.
मीडल ऑर्डरला सातत्य राखता येत नाही, ही टीम इंडियाची नेहमीचीच डोकेदुखी झालेली आहे. त्यातच बॉलिंगची नसलेली धार, ही सुद्धा चिंतेची बाब म्हणावी लागेल.
टीम इंडियाच्या बॉलिंगला धार नसताना सेमी फायनलमध्ये मिळालेलं यश उल्लेखनीय आहे. आता फायनलमध्ये श्रीलंकेचं दहन झालंच पाहिजे. तब्बल 28 वर्षानंतर भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी प्राप्त झाली आहे. 'अभी नहीं तो कभी नहीं' या न्यायानं एक पाऊल पुढे टाकत टीम इंडियानं वर्ल्ड कप मिळवलाच पाहिजे.

Sunday, March 20, 2011

जाणता राजा !

जगाच्या इतिहासात अनेक राजे - महाराजे, सुलतान होऊन गेले आहेत. अर्थात यामध्ये मोठ्या प्रमाणात वंश परंपरा किंवा दगाबाजी करून झालेलेही अनेक जण होते. मात्र या सर्व राजे - महाराजे, आणि सुलतानांची आज आठवण ठेवली जाते. कोणत्या राजाची जयंती उत्साहात साजरी केली जाते ? अनेक राजे, सुलतान हे इतिहासात गडप झाले आहेत. मात्र एक जाणता राजा असा आहे की, ज्याची अनेक वर्षांपासून उत्साहात जयंती साजरी केली जाते. आणि तो राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. कारण शिवाजी महाराज हे काही वंश परंपरेने राजे झाले नव्हते. इतिहास हा त्यांच्या शिवाय अधूरा आहे, कारण स्वत: शिवाजी महाराजांनीच इतिहास घडवलेला आहे.
मोघलशाही, आदिलशाहीमुळे खचून गेलेल्या इथल्या रयतेला लढायला शिकवलं ते शिवाजी महाराजांनी. चार शतकांपूर्वी आपल्या देशात ख-या अर्थानं जन्म झाला तो लोकशाहीचा. शिवाजी महाराजांचा शिवकाल हीच खरी लोकशाही. मावळ्यांच्या मदतीनं त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांचा जन्मच झाला नसता तर हा देश इस्लामी राजवटीचा गुलाम बनला असता. सर्वांना डोक्यावर गोल टोप्या घालून मशिदीत नमाज अदा करावी लागली असती. मात्र शिवाजी महाराजांमुळं ही 'हरित क्रांती' टळली.
शिवाजी महाराजांची दूरदृष्टी अफाट होती. स्वराज्य प्रबळ करण्यासाठी किल्ले आणि सागरी किल्ले महत्वाचे आहेत. हे त्यांनी हेरलं होतं. मात्र या सर्वांपेक्षा त्यांच्यातली जिद्द आणि गनिमी कावा आजही प्रेरणा देणारा आहे.
संपूर्ण शिवचरित्र हेच विविध पराक्रमांनी भारलेलं आहे. मात्र यात मैलाचा दगड ठरावा तो प्रतापगडच. कारण याच प्रतापगडाच्या पायथ्याशी जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारा इतिहास घडला. शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य चिरडून टाकण्यासाठी अफजल खान हजारो सैन्य, मोठं घोडदळ, अजस्त्र हत्ती, दारूगोळा घेऊन चालून आला होता. मात्र शिवाजी महाराजांनी युद्ध कलेचं मोठं उदाहरण इथं जगाला दाखवून दिलं. महाराजांनी मोठ्या चातूर्यानं खानाला निरोप पाठवून बोलणीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावलं. अफजल खानाला वाटलं की, शिवाजी महाराज घाबरले. पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की, तो आता महाराजांनी जो भाग कायम पायदळी तुडवलेला आहे, तिथंच तो चालला होता. एवढंच नव्हे तर हजारोंचे सैन्य घेऊन आलेल्या अफजल खानाला शेवटी दहा जण घेऊन महाराजांबरोबर बोलणी करण्यासाठी यावं लागलं. शिवाजी महाराजही दहा जणांसह खानाच्या भेटीला गेले.
मात्र खानानं जो दगाफटका करायचा तो केलाच. त्यानं शिवाजी महाराजांवर वार केला. खानाची प्रवृत्ती महाराजांना माहित असावी, त्यामुळं त्यांनी आधीच घातलेल्या चिलखतामुळं ते बचावले. दुस-याच क्षणी महाराजांनी वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. ही घटना म्हणजे महाराजांनी अफजल खानाचा वध केला, इतकीच मर्यादीत नाही. कारण त्या काळात देशात पसरत असलेल्या इस्लामी साम्राज्यालाच या वधामुळं धक्का बसला. मोघलांची सगळी शक्ती शिवाजी महाराजांच्या विरोधात खर्ची पडली. मोघल साम्राज्य भारतातच अडकून पडलं. शिवाजी महाराज नसते तर मोघल साम्राज्याचा श्रीलंका, म्यानमार आणि त्याच्या पुढेही विस्तार झाला असता. मात्र शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळं ही हिरवळ दूरवर पसरू शकली नाही.
वैरी मेला वैर संपले, या न्यायानं महाराजांनी अफजल खानाची प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर बांधली. महाराजांनीच त्याची आतडी बाहेर काढली होती. कारण दहशतवाद हा असाच संपवायचा असतो. बिर्याणी खायला देऊन दहशतवाद संपत नसतो. मात्र एकदा अफजल खानाचा वध केल्यानंतर त्याची कबर बांधण्याचा दिलदारपणा इतिहासात कुठे सापडणं शक्यच नाही. मात्र ही कबर म्हणजेही एक इशाराच होता. या हिंदवी स्वराज्यावर जर चालून आलात तर तुमचीही अशीच कबर खोदली जाईल, असा इशाराच महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी घालून दिला.
शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात मुस्लिमांनाही दुय्यम वागणूक नव्हती. सैन्यात आणि महाराजांच्या अंगरक्षकांमध्येही मुस्लिम होते. लढाईच्या वेळी महिला आणि त्यांच्या अब्रूचं रक्षण करण्याचा दंडकच घालून देण्यात आला होता. या मुळंच सर्व रयतेला हे आपलं राज्य वाटत होतं. हा राजा जनतेला जाणून घेणारा होता. जनतेलाही राजाचं प्रेम जाणवत होतं. त्यामुळंच हा राजा 'जाणता राजा' म्हटला
परकीयांशी दिलेला लढा, जिंकलेले किल्ले, आग्र्याहून सुटका, सुरतची लूट, राज्याभिषेक या सारख्या अनेक शौर्यांची प्रेरणा महाराजांपासून घेता येते. सागराचे महत्व आणि त्याच्या सुरक्षेचा वेध चार शतकांपूर्वीच महाराजांनी घेतला होता. त्यामुळंच त्यांनी अनेक जलदूर्ग बांधले. मात्र शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या नादान राज्यकर्त्यांना घेता आला नाही. आणि त्यामुळंच मुंबईवर 26/11चा हल्ला झाला. राज्यकर्त्यांची शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची मानसिकता नाही. त्यांचा 'आदर्श'च मुळात 31 मजल्यांचा आहे. त्या कुलाब्यातल्या सोसायटीत चार फ्लॅट पदरात पाडणं हाच त्यांचा आदर्श.
व्हियतनाम मधल्या जनतेनंही अमेरिकेच्या साठ हजार सैनिकांची कबर खोदली होती. कारण तिथल्या जनतेनं शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आत्मसात केला होता. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या जोरावर त्यांनी बलाढ्य अमेरिकेला धूळ चारली. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यामुळंच विजय मिळाल्याचं तिथली जनता सांगते. असा हा जागतिक किर्तीचा राजा आपल्या देशात होऊन गेला. आणि आज आपल्यावरच दहशतवादी हल्ले होताहेत. कारण आपण दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालत बसलो आहोत. दहशतवाद असा संपूष्टात येत नाही, हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं आहे. होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा हर हर महादेव, जय भवानी - जय शिवाजी, मग बघा कुणाची माय व्याली आहे, इथं हल्ले करायला ?

Sunday, March 13, 2011

अशी नसते गं आई !

8 मे महिला दिन. ऑफिसमध्ये सकाळ पासून महिला दिना विषयीच्या बातम्या सुरू होत्या. वेगवेगळ्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी बजावणा-या महिलांच्या बातम्या प्रत्येक बुलेटिनमध्ये जात होत्या. आणि त्यातच एक ब्रेकिंग न्यूज आली. मालाड पूर्वेला सह्याद्री टॉवर्स इमारतीत राहणा-या निधी गुप्ता या महिलेनं दोन लहान मुलांसह आत्महत्या केली. अंगावर शहारे आणणारी ही बातमी, आणि एकीकडे महिली दिनाच्या बातम्या देत असतानाच निधी गुप्ताच्या आत्महत्येचीही बातमी करावी लागली.

चार्टर्ड अकाऊंटन्ट असलेल्या निधी गुप्तानं गौरव आणि महिका या दोन लहानग्यांसह आत्महत्या केली. मनाला सुन्न करणारी ही बातमी. आई पोटच्या मुलासाठी काय करत नाही ? आई तर एक पिढीच घडवते. मुलांची शाळा नव्हे तर विद्यापीठच आई असते. गौरव आणि महिकाच्या आईनं असं का केलं असेल ?
अशी नसते गं आई ! असंच तर ही मुलं तिला म्हणत नसतील ना ?
आपल्या देशातली एकत्र कुटुंब पद्धती ही जगात आपली ओळख होती. मात्र या नाते - संबंधांमध्ये आता त्सुनामी आली आहे, हेच या आत्महत्येतून स्पष्ट होत नाही का ? आपणही किती संवेदनाहीन झालो आहोत. मनाला चटका लावणारी ही बातमी, मात्र त्यावर रोखठोक चर्चा झालीच नाही. समाजातली मते - मतांतरे व्यक्त झालीच नाहीत. 11 मार्चला जपानमध्ये त्सुनामी आली. त्या त्सुनामीत नाते संबंधांच्या या त्सुनामीची बातमी वाहून गेली.
जग सोडून जाणारी निधी गुप्ता, मरणाच्या वाटेवर जाताना मुलांना का सोबत घेऊन गेली असेल ? मुलांना मृत्यूच्या दाढेत लोटताना तिचे हात का थरथरले नसतील ? मुलांकडं बघून जगण्याची नवी जिद्द निर्माण होते. मुलांच्या निरागस हास्यासमोर जगातली सर्व दु:ख विसरून जायला होतं. मग हे सर्व निधीला का जाणवलं नसेल ?
आता या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सासरच्या मंडळींच्या जाचामुळे निधीने हे पाऊन उचलल्याचं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. पुढिल तपासात सत्य बाहेर येईलही. मात्र निधीबरोबर
वावरणा-यांना, तिच्या नातेवाईकांना तिची घालमेल जाणवली नसेल का ? निधीच्या पतीला दारूचं व्यसन होतं. तसंच प्रॉपर्टीवरूनही वाद सुरू होता. या कौटुंबिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी वेळीच का पुढाकार घेतला नसेल ? जर त्यांच्या कुटुंबात संवाद असता, नाते - संबंधांमध्ये जिव्हाळा असता तर अशी घटना नक्कीच घडली नसती.
आपली कौटुंबिक आस्था कमी होत चालल्याचंच हे प्रतीक आहे. नातेसंबंधांमध्ये निर्माण होणारा तणाव, वाढती स्पर्धा, आणि घड्याळाच्या काट्यालाही मागे टाकून पुढे जाण्याची घाई यामुळं प्रत्येक व्यक्ती आत्मकेंद्री होत चालली आहे. या आत्मकेंद्री प्रवृत्तीमुळं समाजातला संवाद खुंटत चालला आहे. त्यामुळंच समाजात निकोप वातावरण निर्माण व्हायला हवं. घर हे फक्त भिंती असता कामा नये. घराघरातली घट्ट नातेसंबंधच अशा प्रकारच्या आत्महत्या रोखू शकतात. जिवनात कितीही तणाव असला तरी आत्महत्या हा काही मार्ग नव्हे.

Sunday, February 27, 2011

टग्यांचे वारसदार, बलात्कारी आमदार

राजकारणात राहून खरं बोलणं हा गुण फार कमी राजकारण्यांमध्ये आहे. कारण खरं बोलणा-यांना राजकारण करताच येत नाही. मात्र राजकारण करतानाही खरं बोलण्याची किमया अजित'दादा' पवार यांनी साधली आहे. मीडिया बॅन केला पाहिजे, पत्रकारांना दंडुके मारले पाहिजे अशी परखड भूमिका त्यांनी नांदेडमध्ये घेऊन पत्रकारांना पोलिसांच्या हातून 'प्रसाद' दिला होता. सहकार क्षेत्रातल्या त्यांच्या बगलबच्च्यांची भलावण करण्यासाठी तिथे टगेच लागतात, असं सांगताना 'मी ही एक टग्या' असल्याची कबूली दिली होती. तर शनीशिंगणापूरमध्ये हॉस्पिटलचे उदघाटन करण्याच्या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांना 'गांडूळा'ची उपमा दिली होती. तर अशी ही टगेगिरी त्यांनी जाहीरपणे सांगितली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. त्याच्याच जोरावर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळवलं आहे. छगन भुजबळांना कोणतीही 'टाळी' न वाजवता, त्यांच्या पदावरून पायउतार करण्याची किमया त्यांनी साधली आहे. याला दुस-या भाषेत टगेगिरीही म्हणायला खुद्द अजित पवारांचीही हरकत असणार नाही. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मितीच सहकारातले टगे, सोसायट्यांचे टगे, वतनदार टगे, गावागावातले गुंड आणि टगे यांना पोसण्यासाठी झालेली आहे. या सर्व टग्यांचे पोशिंदे आणि नेते अजित पवार आहेत, असं म्हणनं धाडसाचं होणार नाही.
आता दुसरी गंमत बघा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी 50 टक्के आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीचे स्वागतच होईल, यात शंका नाही. मात्र पवार साहेब महिलांना आरक्षण देण्याबरोबरच तुमच्या पक्षाच्या आमदारांकडून संरक्षण मिळेल का ? या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करा.
कारण वीस वर्षाच्या तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही या वाघाला ( वाघ कसला बलात्कारी लांडगाच ) पक्षातून निलंबित केलं आहे. पण ऐवढी कारवाई पुरेशी आहे का ? या वाघाला पक्षातून बडतर्फ करून, आमदारकीचा राजीनामा का घेतला नाही ? त्याचे निलंबन रद्द करून तुरूंगातून सुटल्यावर त्याला केलेल्या 'कृत्या'बद्दल महाराष्ट्र भूषण किंवा टग्या भूषण असा एखादा पुरस्कार देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढा-यांचा ( टग्यांचा ) विचार आहे का ?
संभाजीनगर जिल्ह्यातले कन्नडेच मनसे आमदार मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी ताफ्यात घुसले होते. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या बाचाबाचीनंतर हर्षवर्धन जाधवांना मारहाण करण्यात आली. ती मारहाण इतकी क्रूर होती की, त्यांचा पार्श्वभाग काळा-निळा पडला होता. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा गुन्हा त्यांनी केला होता. मात्र ते विरोधी पक्षाचे आमदार होते. आता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने तर आचारसंहिता सुरू असताना सरकारी विश्रामगृहात तरूणीवर बलात्कार केलाय. नोकरी लावून देण्याच्या बहाण्यानं हतबल तरूणीवर बलात्कार करण्याचे कृत्य त्यांनी केले. कायदा - सुव्यवस्थेचा आव आणणारे गृहमंत्री आर.आर.पाटील, हा वाघ अजून त्याच्या पायावर चालतोच कसा ? याचे उत्तर द्या. हर्षवर्धन जाधव सारखा याला का फोडत नाहीत ? या वाघाने केलेल्या कृत्याबद्दल त्याच्या पार्श्वभागाला हार लावून 12 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर सत्कार करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा विचार आहे का ?
वाळूमाफिया, दूधमाफिया, सहकारमाफिया,कारखानदारमाफिया,भेसळमाफिया,तेलमाफिया या सर्वांचे पोशिंदे असलेल्या या टग्यांच्या वारसदारांकडून राज्यात काहीही भ्रष्टाचारमुक्त राहिलेले नाही. आता तर त्यांनी इज्जतीवर हात घालायलाच सुरूवात केली आहे. 'टग्यांचा खरा वारसदार कोण ?' अशीच स्पर्धा राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात यापेक्षाही भयानक घटना घडू शकतील. देवा आता तूच वाचव रे बाबा. देवा तू तरी आहेस ना जागेवर ? का तूझीही या टग्यांनी भेसळ केली ?

Tuesday, February 22, 2011

गोध्राकांड : पूर्वनियोजित कट हेच सत्य


27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्सप्रेसच्या एस-6 कोचमध्ये जिवंत जाळलेल्या 59 कारसेवकांच्या आत्म्यांना हायसं वाटलं असेल. कारण न्यायालयानं गोध्रा जळीतकांड हा पूर्वनियोजित कटच असल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालामुळं काँग्रेससारख्या जातीयवादी पण धर्मनिरपेक्षतेचा आव आणणा-या पक्षांचा आणि सेक्युलर म्हणवाणा-या एका वर्गाचंही चांगलंच थोबाड फुटलं आहे. कारण ज्या दिवशी या कारसेवकांना धर्मांध मुस्लिमांनी जाळलं त्या नंतर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्षतावादी
म्हणवणा-यांच्या प्रतिक्रिया आठवल्या तरी अंगावर शहारे येतात. मतांसाठी हिंदूत्ववाद्यांनीच आग लावली असा संतापजनक आरोप करण्यात आला होता. लालू प्रसाद यादव सारख्या मुर्ख रेल्वेमंत्र्यानं नेमलेल्य कमीशननंही तसाच अहवाल दिला होता. ही अशी धर्मनिरपेक्ष अवलाद जर देशात निपजलेली असेल तर हिंदूंचं काय भलं होणार ? आता न्यायालयाच्या निकालाची एक प्रत त्या मूर्ख लालूच्या थोबाडावर फेकून मारायला हवी. कारसेवकांनी मुलींची छेड काढल्यामुळं काही मुस्लिमांबरोबर त्यांचं भांडण झालं आणि त्याच पर्यवसन त्यांना जाळण्यात झालं अशीही एक घाणेरडी थेअरी मांडण्यात आली होती.

मात्र हे हत्याकांड गोध्रा शहरातल्या ज्या रेल्वे स्थानकाजवळ घडलं ती वस्ती संपूर्णपणे मुस्लिमांची आहे. त्या भागाला मिनी पाकिस्तान असंही म्हटलं जातं. ज्या पद्धतीनं रेल्वेचा अख्खा कोच जाळण्यात आला त्यावरून तो कट किती तरी दिवस आधीच शिजला होता, हे स्पष्ट होतं. मात्र धर्मनिरपेक्षतावाद्यांची जीभ हे हत्याकांड मुस्लिमांनी घडवलं हे म्हणायला कचरत होती. आता न्यायालयाच्या निकालानं त्यांची जीभच हासडली गेली आहे.

गोध्राकांड ज्या दिवशी घडलं त्याच्या दुस-या दिवशी हिंसक प्रतिक्रिया उमटली. मात्र ही हिंसक प्रतिक्रिया मुस्लिमांच्या मोहल्ल्यात उमटली. अहमदाबादमध्ये मुस्लिमांनी दोन हिंदूंची हत्या केली. आणि मग त्या नंतर शांत असलेल्या हिंदूंनी रस्त्यावर उतरून 59 कारसेवकांच्या हत्येचा बदलाच घेतला. साबरमती एक्सप्रेसमध्ये जाळून मारण्यात आलेल्यांमध्ये 20 लहान मुलं होती. पंधरा महिला होत्या. मात्र धर्मांधांचे हात त्यांना जाळताना थरथरले नाहीत. या घटनेची प्रतिक्रिया मग रस्त्या - रस्त्यावर उमटली. अर्थात या ठिकाणी त्या प्रतिक्रियेचं समर्थन करण्याचा हेतू नाही. मात्र 'क्रिया' घडलीच नसती तर 'प्रतिक्रिया'ही उमटली नसती, हे ही लक्षात ठेवायलंच हवं. गोध्राकांडाला आता नऊ वर्ष होऊन गेली आहेत. मात्र या नऊ वर्षात गुजरातमध्ये कुठेही दंगल घडली नाही. कारण तिथं दंगलखोर जातीला चांगलाच धडा शिकवण्यात आला आहे. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असा दराराच तिथं निर्माण झाला आहे. नाठाळाच्या माथी काठी हाणावीच लागते.
हिंदू हा मुळातच शांतताप्रिय आहे. या शांततेमुळंच हिंदू हे प्रतिक्रियावादी बनले आहेत. मोघल शासक बाबरनं राम मंदिर पाडून मशीद बांधली. याची प्रतिक्रिया ही बाबरी मशीद पाडण्यात झाली होती. मुस्लिमांनी 59 कारसेवकांना जाळलं, त्याची प्रतिक्रिया म्हणून दंगली पेटल्या. त्यामुळं या 'क्रियावादी' शक्तींना रोखण्याची गरज आहे. आणि क्रियाच झाली नाही तर प्रतिक्रियाही उमटणार नाहीत, हे ही तितकंच सत्य आहे.
या धर्मनिरपेक्षतावाद्यांनी कारसेवकांच्या जळीतकांडानंतर जशा थेअरी मांडल्या होत्या, तशीच थेअरी या ठिकाणी मांडू यात. समजा 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्सप्रेसमध्ये कारसेवकांना जाळण्याऐवजी हज यात्रेला जाणा-या मुस्लिमांना जाळण्यात आलं असतं तर ? काय प्रतिक्रिया उमटली असती. कारसेवकांच्या जळीतकांडाची प्रतिक्रिया फक्त गुजरातमध्येच उमटली होती. मात्र जर हज यात्रेकरूंना जाळलं असतं तर ? अहो देशभर तर सोडाच जगभरात प्रतिक्रिया उमटल्या असत्या. रस्त्या - रस्त्यावर धर्मांध मुस्लिम उतरले असते. त्यामुळं शांतताप्रिय हिंदूंना डिवचू नका, यातच सगळ्यांचं हित सामावलेलं आहे.
न्यायालयानं गोध्राकांड प्रकरणी 31 जणांना दोषी ठरवलं आहे. तर 64 जणांची पुराव्याअभावी सुटका केली आहे. आता या दोषींनी कठोर शिक्षा मिळायलाच हवी, तरच 59 कारसेवकांच्या आत्म्यांना मुक्ती मिळू शकेल.

Friday, February 18, 2011

आता सगळं - सगळं विसरा !

19 फेब्रुवारीपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. 2 एप्रिल रोजी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर फायनल मॅच होणार आहे. त्यामुळे या 43 दिवसांच्या अवधीत सगळेच प्रश्न मागे पडणार आहेत. प्रश्नच नव्हे तर सगळे घोटाळे, भ्रष्ट राजकारणी यांना आता संरक्षणच मिळणार आहे. कारण आता मीडियात चर्चा राहणार आहे ती फक्त वर्ल्ड कपचीच. आता खुद्द मीडियालाच आठवण राहणार नाही की, त्यांनी कोणकोणत्या प्रश्नांवर रान उठवलं होतं. मीडियामुळेच कॉमनवेल्थ घोटाळ्याचे आक्राळविक्राळ रूप जगासमोर आले होते. वाळुमाफिया, तेल माफिया यांच्यावर काही प्रमाणात अंकुश आला तो मीडियामुळेच.
मात्र आता, वर्ल्ड कपचे हे 43 दिवस म्हणजे या माफियांसाठी फॉलोऑनच म्हणायला हवा. कारण धर्माला अफूची गोळी म्हटलं जातं. आणि आपल्या देशात क्रिकेट हा धर्मच असल्यानं या अफूच्या गोळीचा तब्बल 43 दिवसांपर्यंत अंमल राहणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार, घोटाळे, वाळुमाफिया, पेट्रोल माफिया, डिझेल माफिया, रॉकेल माफिया, दूध माफिया, शिक्षण माफिया, साखर माफिया, कांदा माफिया यांच्यावर कोणाचाही अंकुश राहणार नाही. या सर्व माफियांवर कायद्याने जरब बसवण्याची क्षमताच सरकारमध्ये राहिलेली नाही. मीडियामुळेच यांच्यावर थोडाफार अंकुश राहिलेला आहे. परिणामी मीडियाची जबाबदारी वाढलेली आहे. मीडियाने स्वत:वर या अफूच्या गोळीचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
कालच म्हणजेच 17 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयानं आदर्शप्रकरणी गहाळ झालेल्या फाईलचा तपास सीबीआयकडे सोपवला. कारण चोरच चोरीचा तपास लावणार नाहीत, हे न्यायालयाच्या लक्षात आलं आहे. कारण या राज्यात फाईलच नव्हे तर अख्खं सरकारच गहाळ झालेलं आहे. आता याचा तपास कोणाकडे द्यायचा ? राज्यात राज्यकर्ते नव्हे माफियांचे पोशिंदेच सरकार चालवत असल्याने माफियांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.
सरकार काम करत नाही. मात्र गैरमार्गाने सगळी कामे होत आहेत. त्यामुळे राज्यात आणि देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे. क्रिकेट वर्ल्ड कप हा मोठा इव्हेन्ट असला तरी मीडियानं या घोटाळ्यांवरून लक्ष विचलीत होऊ देता कामा नये. कारण राज्यात आणि देशात भ्रष्टाचारी नेते, अधिकारी हे देश विकण्यासाठी टपलेले आहेत. या बोक्यांना देश फक्त ओरबडून खायचा आहे. या बोक्यांची शिकार करायची असेल तर मीडियाला सजग रहावंच लागेल.

Friday, January 28, 2011

महाराष्ट्र नव्हे माफियाराष्ट्र !

या राज्यात चाललंय तरी काय ? सनदी अधिका-यांना दिवसा ढवळ्या डिझेल टाकून जाळलं जात आहे. पोलीस विरोधी पक्षाच्या आमदारांचा पार्श्वभाग बडवून बडवून लाल - निळा करत आहेत. मंत्रालयात भ्रष्टाचार करणा-या आरोग्य विभागातल्या कर्मचा-याच्या कानाखाली आमदार आवाज काढत आहेत. गृहमंत्री आर.आर. पाटलांच्या जिल्ह्यात तलाठ्याच्या अंगावर वाळू माफिया ट्रॅक्टर घालत आहेत. आरटीआय कार्यकर्ते तर भ्रष्टाचा-यांच्या हिट लिस्टवर आले आहेत. पोलीस, अधिकारी, माफिया, नेते, मंत्री हे सगळेच भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. या सगळ्यांची एक संघटित साखळीच राज्याला पोखरून काढत आहे.
आता न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत आहेत त्या धाड टाकण्याच्या. खरंच कुणाचाही विश्वास बसत नसेल पण सरकार कामाला लागलं आहे. शुक्रवारी दोनशे ठिकाणी धाड टाकून 180 जणांना अटकही करण्यात आली. आणि विरोधी पक्ष आरोप करतात की, मंत्रालयात एका मंत्र्याला म्हणे 25 कोटी रूपये दिले. 25 कोटी रूपये वर्गणी गोळा करून देण्यात आल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय.
याला म्हणतात 'आदर्श भ्रष्टाचार'. लाच घ्यायची पण कुणावरही त्याचा लोड यायला नको. म्हणून सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून 25 कोटी रूपये उभे केले, आणि मंत्रालयात पोहोचते केले. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की, इकडे-तिकडे फुटकळ छापे मारून सटरफटर लोकांना अटक करण्यापेक्षा मंत्रालयावरच छापा मारून या भ्रष्ट कारभाराच्या माफियांनाच का अटक करत नाहीत ?
आता जनतेनेच पुढाकार घ्यायला हवा. गावागावातल्या गुंडांना घाबरून राहण्यापेक्षा त्यांना हप्ता देण्यापेक्षा, पेट्रोल - डिझेलमधली भेसळ सहन करण्यापेक्षा एक वेगळा मार्ग काढता येऊ शकतो. भेसळ, भ्रष्टाचार याचा थेट पैसा हा मंत्री आणि मंत्रालयात पोचतो. मंत्री आणि सामान्य नागरिकांमध्ये कशाला हवेत (बडवे) गुंड. मंत्री म्हणजे आजचे देवच नाही का ? त्यामुळे कंसात गुंडांसाठी बडवे हा शब्द वापरला. थेट मंत्र्यांनाच का पैसे देऊ नये. त्यासाठी मंत्रालयाच्या बाहेर प्रत्येक नागरिकाने दर महिन्याला पन्नास रूपये हप्ता द्यावा. त्यासाठी वेगळं 'खातं' निर्माण करावं. प्रत्येक गाव, तालूका आणि जिल्हा पातळीवर प्रत्येक नागरिकाकडून पन्नास रूपये हप्ता सक्तीने गोळा करावा. पैसा थेट मंत्र्यांना मिळेल. त्यामुळे त्यांना गुंडांची गरज भासणार नाही. परिणामी राज्यातली गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार संपायला मदत होईल.
राज्यात वाढलेली गुन्हेगारी, अवैध बांधकामे, नाक्या नाक्यावरील हप्तेखोरी, लवासा सारख्या नियम
मोडणा-या कंपनीची राष्ट्रवादीने घेतलेली ( सुपारी ) वकिली, आदर्शमध्ये उघड झालेली राजकारण्यांची नावे, खाजगी शिक्षण संस्थांनी सर्वसामान्यांची चालवलेली लूट, लाच दिल्याशिवाय होत नसलेली कामे, हे सर्व पाहता इथे कायद्याचे राज्य आहे, असं कुणीही म्हणू शकत नाही.
गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी डान्स बार बंदी संदर्भात अशी घोषणा केली होती की, ज्या पोलीस उपायुक्तांच्या हद्दीत डान्स बार सुरू राहतील त्या पोलीस उपायुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. पण आज मुंबईत काय चित्र आहे ? डान्स बार सुरूच आहेत. कुणावरही निलंबन झाले नाही. आता पर्यंत किती पोलीस अधिका-यांचे निलंबन झाले ? याची आकडेवारी कधीच जाहीर झाली नाही. मात्र मधल्या मधे हप्ते वाढवून घेतले गेले. आजही मुंबई आणि परिसरात डान्स बारची छमछम पोलिसांच्याच आशिर्वादानं सुरू आहे. याची गृहमंत्र्यांना माहिती नसेल का ?
हे धाड आणि छापा मारण्याचे नाटक काही दिवस सुरू राहील. त्यानंतर पुन्हा ऐ रे माझ्या मागल्या. जो पर्यंत दुसरा सोनवणे जाळला जात नाही, तो पर्यंत धाडी टाकल्या जाणार नाहीत. कारण या राज्यातल्या मंत्र्यांची किंवा सरकारची भ्रष्टाचार संपवण्याची मानसिकताच नाही. कारण या मंत्र्यांची मानसिकता ही माफियाची झालेली आहे. त्यांना सामान्य नागरिकांविषयी कोणतीही चाड राहिलेली नाही. मिळेल तसा पैसा त्यांना ओरबडून काढायचा आहे.

Wednesday, January 12, 2011

मौका सभी को मिलता है !

मनसेचे संभाजीनगर जिल्ह्यातले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना झालेल्या अमानूष मारहाणीनंतर सगळीकडेच संताप व्यक्त होत होता. त्या संतापाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत तोंड फोडले. सुमारे वीस पोलीस त्यात महिला पोलिसही मागे नव्हत्या, या सर्वांनी हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केली. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी, पुढारलेल्या राज्यात बिहारला लाजवणारी घटना घडली. शिवसेनेनेही या घटनेचा निषेध केला. मारहाण झालेल्या हर्षवर्धन जाधव यांचे छायाचित्र पाहून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही संतप्त झाले होते. इतकंच नव्हे तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही या घटनेचा निषेध केला होता. अर्थात राजकीय आकसातूनच ही घटना घडली. कन्नड तालुक्यातल्या अवैध धंद्यांना वेसण घालण्याची आमदार जाधव यांची मागणी होती. त्यातून पोलीस हे चवताळलेले होते. आमदार जाधवांनी हे प्रकरण गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यापर्यंत नेले होते. मुंबईतही मतदारसंघातल्या महिलांना बरोबर घेऊन पाटलांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नेहमीप्रमाणे बोलबच्ची करणा-या पाटलांनी याही प्रकरणाची तड लावली नाही.
मात्र पोलिसांनी त्यांच्या पोटावर पाय देणा-या आमदार जाधवांना लक्षात ठेवले होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरल्याचे निमीत्त करून पोलिसांनी त्यांचे शौर्य दाखवून दिले. कारण पोलिसांच्या पोटाचा प्रश्न होता. कारण दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, अल्प पगार यात पोलिसांचे भागत नाही. त्यामुळे त्यांना दारूवाले, ट्रक ड्रायव्हर्स, बारवाले, बिल्डर्स, दुकानदार, ड्रग्जचा व्यापार करणारे, माफिया, गुंड, रेतीची विक्री करणारे, हॉटेल, ढाबेवाले यांच्याकडून हप्ते घ्यावे लागतात. पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या केसेस न नोंदवता जागेवर तोडपाणी करून दोन्ही पक्षांकडूनही नाईलाजाने पैसे घ्यावे लागतात. बरं आहे, किमान यामुळे कोर्ट कचे-या वाचतात. न्यायालयावरचा ताणही वाचतो. खरंच पोलीस पैसे घेतात, पण त्रासही वाचवतात. जेवढे आठवले तेवढे या ठिकाणी लिहिले. या व्यतीरिक्त काही असेल तर सांगा, त्याचाही समावेश ब्लॉगमध्ये करू. काही पोलीस तर रेड लाईट एरियातूनही हप्ते घेतात. काय करणार ? महागाईच एवढी आहे की, बिचा-या पोलिसांना भाड घेणा-यांकडून भाड घ्यावी लागते. मात्र आमदार जाधवांवर हल्ला करताना हप्ते घेणा-या पोलिसांचे हात थरथरले नाहीत. या बद्दल त्यांना पुरस्कारच द्यायला हवा.
आमदार जाधवांवर हल्ला करणारे हेच पोलीस आता राज्यभरात अवैध धंदे करणा-यांवर हल्ला करतील. नक्षलवाद रोखतील. गुन्हेगारी कमी होईल. नाक्या - नाक्यावर ट्रक वाल्यांकडून हप्ता घेणार नाहीत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा दबदबा निर्माण होईल. अशी आशा करू यात. मात्र या निमीत्ताने 'अरारा आबा, तुमचा नाही ताबा' हेच दिसून येते. राज्यातल्या पोलीस 'खा'त्यावर त्यांचा वचक नाही. हप्तेबाजीत पोलीस दल गुंग झालंय. परिणामी राज्यभरात अवैध धंदे फोफावले आहेत. परप्रांतियांची गुन्हेगारी आणि घुसखोरी वाढली आहे. अवैध झोपड्या आणि बांधकामांचा राज्याला वेढा पडलाय. या सर्वांवर हे हप्तेखोर पोलीस तुटून पडणार आहेत का ?
गृहमंत्री आर.आर.पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जातीयवादी राजकारण तर दादोजी कोंडदेव प्रकरणात उघड झाले होते. मात्र आता तर त्यांची राजकीय अक्कलही गुडघ्यातच आहे, हेच आमदार जाधव प्रकरणातून स्पष्ट झालंय. विरोधकांना विचारांनी नव्हे तर दंडूक्यांनी संपवण्याची ही राष्ट्रवादी पद्धत असावी. नाही तरी मोठ्या पवारांनी महागाईने आम आदमी मरणाला लावलाच आहे. त्यात हे लहाने पवार हातात दंडूका घेऊन विरोधकांना संपवायला निघालेत. तर गृहमंत्री आर.आर.पाटील यांना त्यांचे खाते नेमके कशाशी खातात हेच कळत नसावे. त्यामुळे त्यांनी गुन्हेगार आणि गुन्हेगारीची सफाई होत नसेल, तर किमान राज्यात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात लक्ष घालावे. इतकंच ते करू शकतात.
'मौका सभी को मिलता है', या वेळी आघाडी सरकारला मिळालेला मौका हा मतविभागणीमुळेच मिळालेला आहे. त्यामुळेच या राज्यकर्त्यांना माज चढलाय. मात्र या राज्यकर्त्यांना हा 'मौका' का मिळाला याचा विचार राज ठाकरे कधी करणार आहेत का ?