आताच थोड्या वेळापूर्वी ऑफिसमध्ये माझा एक सहकारी अमर काणे यानं एक मत व्यक्त केलं. ते मत म्हणजे सामान्यांच्या मनात किती संताप खदखदतोय याचंच एक प्रातिनिधीक चित्र आहे. मुंबईतल्या एखाद्या चौकाला कसाबचं नाव द्यायला हवं, असं माझ्या मित्रानं सांगितलं. नाही तरी अजून कसाबला फासावर लटकवलेलं नाही. त्यामुळं या काँग्रेसच्या जावयाचे लाड करायलाच लागतील. खाली दिसणा-या या छायाचित्रातल्या सामान्य नागरिकांना अश्रू ढाळावेच लागतील.
मात्रं हे अजून किती दिवस सहन करायचं ? कोणी पेरले मुंबईत तीन बॉम्ब ? किती जणांच्या स्लीपर सेलनं केलं हे कृत्य ? 'दहशतवादाला धर्म नसतो' हे वाक्य किती दिवस ऐकायचं. जर दहशतवादाला धर्म नसतो तर मग भेंडी बाजारात का होत नाहीत बॉम्बस्फोट ? ज्या धर्मांध मुस्लिमांना जगावर इस्लामचं राज्य आणायचं आहे, ते सांगून सवरून धर्मासाठीच हिंसाचार घडवत आहेत. आणि आपले काँग्रेसी राज्यकर्ते कशाला आणि कशाच्या आधारे म्हणतात की दहशतवादाला धर्म नसतो. मतांसाठी लाचार झालेल्यांना धर्म नसतो. तसाच या काँग्रेसवाल्यांना कोणताही धर्म नाहीच.
या शहरावर अंडरवर्ल्डचं राज्य आहे. दहशतवादीही त्यांना सामील झाले आहेत. अंडरवर्ल्ड म्हणजे मुस्लिम गुन्हेगारांचच या शहरावर राज्य आहे. दहशतवादी संघटनांचे स्लिपर सेल इथल्या मोहल्ल्यांमध्ये आहेत. दहशतवाद्यांना साथ देणारी सापांची हिरवळ या शहरातच नव्हे तर देशभरात आहे, हे सांगण्यासाठी कुणाच्याही साक्षीची गरज नाही. मात्र ही हिरवळ ठेचून काढण्याची हिंमत देशातल्या आणि राज्यातल्या राज्यकर्त्यांमध्ये आहे का ?
यांच्या मतांच्या राजकारणासाठी सामान्यांनी किती दिवस मरायचं ? सामान्यांनी काय फक्त मरणातच जीवन अनुभवायचं ? देशात सुरक्षा नावाची कोणतीच चीज अस्तित्वात नाही. गुन्हेगारांना पकडायचं म्हटलं तर पोलिसांचे हात जातात ते मोहल्ल्यात. आणि तिथं कुणाच्या दाढीला स्पर्श झाला म्हणजे यांचा 'इस्लाम खतरे में' यायचा आणि काँग्रेसची सत्ताही खतरे में. त्यामुळं काँग्रेस आणि धर्मांध मुस्लिमांचं असं साटंलोटं जमून आलं आहे. देशावर असलेलं इस्लामी दहशतवादाचं संकट दिवसेंदिवस गडद हिरवं होत चाललं आहे. भ्रष्टाचारानं बरबटलेलं आणि मुस्लिमांचं फक्त मतांसाठीच अनुनय करणा-यांचं सरकार सत्तेत असे पर्यंत हे सहन करावंच लागेल.
अमेरिकामध्ये 9/11 ला एकच हल्ला झाला. यानंतर अमेरिकेनं आपली सुरक्षा यंत्रणा इतकी मजबूत केली की या देशात एकही हल्ला झाला नाही. आपला देश मात्र केंद्रासरकारच्या नाकर्तेपणामुळे अतिरेक्यांसाठी स्फॉट स्टेट बनलाय.
ReplyDeleteमुंबई पुन्हा पूर्वपदावर आली, मुंबईकर पुन्हा कामाला लागला ही वाक्य किती वेळा म्हणावी लागणार ?
ReplyDelete