Wednesday, August 14, 2013

15 ऑगस्ट 1947 : फाळणीकडून फाळणीकडे ?

15 ऑगस्ट 1947, आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. त्यामुळेच आज आपण स्वतंत्र देशात श्वास घेत आहोत. देशासाठी अनेक हुतात्मे झाले त्यांच्या हौतात्म्यामुळेच स्वातंत्र्य मिळालं. मात्र स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला काय दिलं ? तर त्या नेत्यांनी आपल्याला दिली फाळणी. आणि ती फाळणीही अशी दिली आहे की, ज्यात दुस-या फाळणीची पेरणी झालेली आहे. धर्माच्या आधारावर फाळणी झालेली असल्याचा धडा आपण विसरलो, आणि तिथच दुस-या फाळणीची बीजं रोवली गेली.
स्वातंत्र्य दिन आहे. काही तरी लिहावं, म्हणून हा ब्लॉग लिहिलेला नाही. तर यासाठी अनेक दिवसांपासून विचार सुरू होता. स्वातंत्र्य आणि फाळणी या दोन्ही घटकातील फाळणी हा घटक नेहमीच अस्वस्थ करणारा आहे. फाळणी का झाली ? कशामुळे झाली ? फाळणी झाली नसती तर काय झालं असतं ? फाळणीचे फायदे-तोटे, असे अनेक प्रश्न मनात येत घोळत होते. आणि त्याचवेळी "काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला ?" हे प्रा. शेषराव मोरे यांचं पुस्तक वाचनात आलं. त्यातून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. प्रा. शेषराव मोरे यांचा त्यांच्या पुस्तकातील एक उतारा खाली परिच्छिद करतो.

भारताच्या फाळणीसाठी कॉंग्रेसला व गांधीजींना ‘जबाबदार’ धरायचे की त्यांना फाळणीचे ‘श्रेय’ द्यायचे? ‘गांधीजींमुळेच आम्ही फाळणी स्वीकारली,’ असे नेहरू म्हणाले ते काही खोटे नव्हते. एका टप्प्यानंतर ‘अखंड भारता’चा आग्रह धरल्यास देशातील बहुसंख्य हिंदूंच्या हिताचे रक्षण करणे आणि एक राष्ट्र म्हणून कारभार चालविणे अशक्यप्राय आहे, याची सुस्पष्ट जाणीव गांधीजींसह कॉंग्रेसला पहिल्यापासूनच होती. म्हणूनच भारताची फाळणी कॉंग्रेसने पूर्ण विचारांती स्वीकारली. - प्रा शेषराव मोरे
शेषराव मोरे यांचा हा निष्कर्ष वाचून मनातल्या एका प्रश्नाचं उत्तर मिळतं, काँग्रेसला स्वातंत्र्य हवं होतं, मात्र अखंड भारत नको होता. "हिंदू व मुसलमान ही दोन समान राष्ट्रं असून, त्यांना अखंड भारताच्या राज्यसत्तेत समसमान वाटा मिळाला पाहिजे" अशी त्या काळातल्या अनेक 'राष्ट्रवादी' मुस्लिमांची मागणी होती. नंतर हा समसमान वाटा पाकिस्तानच्या वाटेवर गेला. बॅ. जिना यांनी पाकिस्तानची मागणी रेटून धरली. स्वातंत्र्याच्या इतिहासातील शेवटच्या काही वर्षांमध्ये जसा स्वातंत्र्याचा लढा सुरू होता, तशीच फाळणीची बोलणीही सुरू होती. स्वातंत्र्य लढ्यापेक्षा फाळणीवरच नेत्यांचं अधिक लक्ष केंद्रित झालं होतं. कारण ही बोलणी तितकी सोपी नव्हती. "आम्ही सातशे वर्षे राज्य केलं, ही भावना सोडायला व लोकशाही राज्यात अल्पसंख्याक म्हणून राहायला मुसलमान तयार नव्हते". पोलीस आणि सैन्य दलातही मुस्लिमांची मोठी संख्या होती. त्यामुळे अखंड भारत रहावा अशी जरी हिंदूंची इच्छा असली तरी मुस्लिम मानसिकता पाकिस्तानच्या बाजूने झुकलेली होती.

प्रा.  शेषराव मोरे यांनी मांडलेला निष्कर्ष पुढील प्रमाणे, "भारतासमोरचा खरा प्रश्‍न स्वातंत्र्यप्राप्ती हा नव्हता, तर स्वतंत्र भारतात हिंदू व मुसलमान एकराष्ट्र म्हणून राहतील काय, हा होता. म्हणून हिंदू-मुस्लिम प्रश्‍न सुटेपर्यंत स्वातंत्र्य नको, अशी गांधीजींची 1942 पर्यंत भूमिका होती. या प्रश्नावर फाळणीचा तोडगा निश्‍चित करूनच 1942 मध्ये त्यांनी "छोडो भारत'ची घोषणा केली होती".
यावरून एक लक्षात येतं की, फाळणी होणारच होती. कारण एका राष्ट्रात दोन राष्ट्र नांदू शकत नव्हती. त्यामुळे फाळणी स्वीकारली गेली. 547 संस्थानं स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आली. मुस्लिमबहुल भाग पाकिस्तानला दिला गेला. मात्र इथंच चूक झाली. नव्हे तर दुस-या फाळणीची बीजं पहिल्या फाळणीतच पेरली गेली. मुस्लिमांची मानसिकता ही शासनकर्ती मानसिकता असल्यानं त्यांना लोकशाही मानवणारी नव्हती. नव्हे तर हिंदू आपल्यावर राज्य करणार हा विचारच त्यांना हादरवून सोडणारा होता. ज्या हिंदूंवर आम्ही सातशे वर्ष राज्य केलं. ते आमच्यावर काय राज्य करणार ? असा त्यांचा सवाल होता. या सर्व बाबींची जाण असतानाही भारतातीली सर्व मुस्लिम पाकिस्तानात पाठवण्याची भूमिका काँग्रेसने का घेतली नाही ? असा सवाल उपस्थित होतो. कारण फाळणीनंतर देशात पुन्हा पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या झाली आहे. भारत - पाकिस्तानातील हिंदू-मुस्लिम लोकसंख्येची आदलाबदल न झाल्याने आज देशात  'हरित क्रांती' घडली आहे. या 'हरित क्रांती'ची फळं सगळ्या देशाला भोगावी लागत आहेत.
'हरित क्रांती'ला लागलेली फळं म्हणजे दहशतवाद, जिहाद, लव्ह जिहाद, दंगली, जातीय तणाव हे होय. देशातले अनेक मोहल्ले हे 'मिनी पाकिस्तान' म्हणून ओळखले जातात. देशातली मोठी शहरं संवेदनशील झाली आहेत. दहशतवाद्यांचे स्लिपर सेल या संवेदनशील भागांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने कधीही देशात बॉम्बस्फोट घडवले जातात. जीवन असुरक्षित झालं आहे. मात्र जर लोकसंख्येची आदलाबदल करून फाळणी केली असती, तर देशात ही परिस्थिती उदभवली नसती.
"हंसके लिया पाकिस्तान, छिन के लेंगे हिंदुस्तान", आझाद काश्मीर या घोषणा पाकिस्तानातच नव्हे तर आपल्या भूमीतही दिल्या जातात. बांग्लादेशमधून सुरू असलेल्या घुसखोरीमुळे आसाममध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी होत चालली आहे. तर मुस्लिम संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. ईशान्य भारताच्या नुसत्या सीमाच नव्हे तर अख्खा ईशान्य भारत बांग्लादेशच्या घुसखोरीमुळे असुरक्षित झाला आहे. पश्चिम बंगालमधील अनेक जिल्हे मुस्लिमबहूल झाले आहेत. त्या भागांसह देशभरामध्ये मदरशांची वाढणारी संख्या काय दर्शवते ? तिथं नेमकं काय निर्माण होणार आहे ? अर्थात हे भूत आपल्याच मानगूटीवर बसणार आहे. हिंदूंना अल्पसंख्य करून हा देश इस्लाममय करण्याचा कट पाकिस्तानात रचण्यात आलेला आहे. फक्त भारतच नव्हेत तर सर्व जग 'पॅन इस्लामच्या' कवेत घेण्याची स्वप्नं पाहणारे कट्टर धर्मांध जगभरात आहेत. आणि आपल्या देशातली ही स्थिती त्यांना सुपीक वाटली तर त्यात नवल ते काय ? फाळणीच्या माध्यमातून भारताचा एक तुकडा पाडलेलाच आहे. आणि ज्या दिवशी या देशातला हिंदू अल्पसंख्य होईल त्या दिवशी भारत हे नाव जगाच्या नकाशावरून पुसून गेलेलं असेल. पाकिस्तानची इस्लामाबाद ही राजधानी असेल, आणि शरियत कायदा लागू झाला तरी त्यात नवल वाटण्यासारखं काही नसेल. भारत हिसकावून घेण्यासाठी पाकिस्तानातील धर्मांध इथल्या स्लिपर सेलच्या मदतीने वेगवेगळे डाव रचत आहेत. आणि जो पर्यंत एक हिंदू राष्ट्र म्हणून आपण कणखर भूमिका घेणार नाही, तो पर्यंत हा दहशतवाद आपल्य मानगुटीवर बसणार आहे.
प्रा. शेषराव मोरे यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, फाळणीच्या काळात दळणवळणाची, वाहतुकीची सोय नव्हती. त्यामुळे सर्वच मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवणं अशक्य होतं. मोरे यांचं हे विधान खरं आहे. मात्र सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवण्याचा कालबद्ध कार्यक्रम ठरवता आला असता. 5 किंवा 8 वर्षात सर्व मुस्लिम पाकिस्तानात गेले असते. पाकिस्तानातील हिंदूंना भारतात आणता आलं असतं. मात्र सत्तेसाठी उतावीळ झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी हा विचारच केला नाही, असं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे देशाची फाळणीच जर धर्माच्या आधारावर झालेली असताना आपण निधर्मी ही भूमिका का घेतली ? जर पाकिस्तान इस्लामच्या मार्गाने जात होता, तर आपण हिंदू राष्ट्र घोषीत करण्यात कच का खाल्ली ?


फाळणी स्वीकारली नसती तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला असता. फाळणीस मान्यता म्हणजे एखादा रोगग्रस्त भाग कापून टाकून उर्वरित शरीर शाबूत ठेवण्यास दिलेली मान्यता होय - सरदार वल्लभभाई पटेल
सरदार पटेलांच्या वरील वाक्यातूनही फाळणी अपरिहार्य होती, हे स्पष्ट होतं. मात्र असं असतानाही धर्माच्या आधारावर फाळणी झालेली असताना लोकसंख्येची आदलाबदल  का केली नाही ? हा प्रश्न पुन्हापुन्हा मनात येतो. सरदार पटेल यांच्यासारख्या कणखर नेत्यानेही भविष्यात कोणतं संकट उभं राहणार आहे, याचा विचार केला नाही अशी शंका येते.

या लेखाचा शेवट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  फाळणीवर केलेल्या पुढील भाष्यानं करतोय.

आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जर
भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे
लागले असते... मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा
फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप
काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा
मार्ग मोकळा झाला आहे.’’ बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे
नाव का घ्यावे लागले?
खमंग फोडणी - डॉ. शेषराव मोरे यांचं काश्मीर, 1857 चा उठाव या विषयावरील लिखण वाचल्यानंतर "काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला ?" हे पुस्तक वाचण्यात आलं. इतकं अभ्यासपूर्ण लिखाण करणारा एक लेखक आपल्या राज्यातल्या नांदेड शहरात आहे. मात्र चॅनेल्सच्या झगमगाटात त्यांच्यावर कधी फोकस नसतो. त्यामुळे असं वाटतं की, प्रा. शेषराव मोरे यांचं नाव, आडनाव आणि शहर चुकलं. कल्पना करा त्यांचं नाव आणि आडनाव प्रस्थापितांसारखं असतं त्यांचं शहर हे मुंबई, पुणे किंवा गेला बाजार अगदीच डोंबिवली किंवा ठाणे असतं तरी आपले सारस्वत त्यांना डोक्यावर घेऊन नाचले असते. प्रा. मोरे नांदेडचे आणि मी संभाजीनगरचा, त्यामुळे एकाच भागातील असल्याने एवढा जिव्हाळा. फाळणीच्या विषयावर लिहीत असताना खमंग फोडणीमुळे आपल्या मुळ विषयाचीही थोडी फाळणीच झाली.

4 comments:

 1. देशाची फाळणी ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे. विशेषत: त्या काळात ज्या निष्पाप नागरिकांनी फाळणीच्या नरकयातना भोगल्या ते वाचताना मेल्याहूनही मेल्यासारखे होते. पण आज विचार केला तर ही फाळणी झाली ते बरेच झाले असे वाटते.
  अर्थात लोकसंख्येची संपूर्ण आदलाबदल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सल्ला स्वार्थी काँग्रेस नेत्यांनी न ऐकल्याने देशात आज ही अवस्था झालीय. मुस्लीमांची संख्या झपाट्याने वाढतीय. हिंदू आकूंचन पावतायत. देशाची वाटचाल पुन्हा फाळणीकडेच ,सुरु आहे.

  ReplyDelete
 2. Phalni jhali te vaitch jhala... Pan jhali nasti tar ek aag dhumsat rahili asti an sarya deshala tyache chatke basat rahile aste... Bharat ek dharmanirpeksh rashtra aahe... Aajchya sthitit Hindu Muslim madhe samtol sadhunch vikas shakya aahe, asa mala vatata... Ajunhi Bharatachya eksangh rastrasathi prarthana karuya... Pudhil Phalni talnyasathi...!

  ReplyDelete
 3. तुमच्या मताशी पूर्णतः सहमत आहे... काँग्रेसने खरंच हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला असता... तर आज पाकड्यांची बिनधास्तपणे भारतावर हल्ला करण्याची हिंमत झाली नसती... घरभेदी भारतात असल्यानं पाकिस्ताननं ह्या कुरुबुरी चालवल्या आहेत... पण आता देशाला खरंच परिवर्तनाची गरज आहे... ऐवढ्या वर्षांत यूपीएनं देशाची वाट लावली... महागाई वाढवली तरी काही जण त्याच्या समर्थनार्थ आहेत... काँग्रेसने देशाची कसली प्रगती केली... आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाची अवस्थाही केविलवाणी झालीय... त्यालाही हे काँग्रेस सरकारच जबाबदार आहे...त्याच्या भार गोरगरिबांवर लादला जातोय.. असो... संतोष सर तुमचा लेख मस्त झालाय आणि डॉ. शेषराव यांनीही छान विश्लेषण केलं..

  ReplyDelete
 4. so what
  je zale te zale aata matra aapla desh kasa abadhit rahil ya vishyi vichar zalapahije anyatha parat eka falnichi vel yeu shakate

  ReplyDelete