Wednesday, April 6, 2011

विश्वविजेते आणि 'लांड्या' मनाचा आफ्रिदी

2 एप्रिल 2011 रोजी टीम इंडियानं श्रीलंकेवर मात केली. आणि टीम इंडिया विश्वविजेता बनली. त्या आधी झालेल्या पाकिस्तान बरोबरच्या लढतीतही विजय मिळवला. या मॅचनंतर आफ्रिदीनं, टीम इंडियानं चांगली कामगिरी केल्याचं सांगितलं. टीम इंडियाचा खेळ सरस असल्यानं बेस्ट टीम जिंकली अशी, प्रतिक्रिया व्यक्त करून त्याच्यातली खेळ भावना दाखवून दिली. टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात सर्वत्र जल्लोष सुरू होता. आणि या जल्लोषाच्या वातावरणातच भारतीयांच्या मनाला छेद देणारी प्रतिक्रिया पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीनं व्यक्त केली. मात्र पाकिस्तानात गेल्यावर त्यानं त्याची एक'जात' प्रतिक्रिया थेट बदलून टाकली. मुस्लिम आणि पाकिस्तानातल्या नागरिकांप्रमाणं भारतीय नागरिकांचे 'दिल बडा नहीं', अशी प्रतिक्रिया त्यानं व्यक्त केली. अर्थात त्यावर वादंग उठल्यानंतर, माझ वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आल्याची उलटी बोंब त्यानं ठोकली.
अरे, आफ्रिदी तुझ्या देशात जितके मुस्लिम राहतात त्या पेक्षा जास्त मुस्लिम या देशात राहतात. तुझ्या देशात अल्पसंख्याक असणा-या हिंदू आणि ख्रिश्चनांना कशी वागणूक मिळते ? युसूफ योहन्ना हा एकेकाळचा ख्रिश्चन महंमद युसूफ का झाला ? कारण तो जर महंमद झाला नसता तर 'साफ' झाला असता. तुझ्या देशातला अतिरेकी अजमल कसाब. शेकडो निष्पाप नागरिकांचे प्राण घेऊनही अजून जिवंतच आहे. त्याला आम्ही बिर्याणी खाऊ घालतो. आमच्या राज्याचे गृहमंत्री तुरूंगात जाऊन 'कैसे हो कसाब ?' अशी विचारणा करतात. ते ज्या खात्याचे मंत्री आहेत ते पोलीस राजरोस रस्त्यावर खंडण्या उकळतात, आमदाराला मार - मार मारतात. त्या आमदारांची गृहमंत्री कधी चौकशी करत नाहीत. पण कसाबची चौकशी करतात. या पेक्षा आणखी कोणता दिलदारपणा आफ्रिदीला हवासा वाटतो ?

पाकिस्तानातून अतिरेकी अव्याहतपणे काश्मीरमध्ये घुसतात, देशभरात त्यांच्या अतिरेकी कारवाया सुरू असतात तरी भारतानं कधी पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही. अरे आफ्रिदी हा दिलदारपणा तुला कसा दिसत नाही ?

2 comments:

  1. पाकिस्तानातून अतिरेकी अव्याहतपणे काश्मीरमध्ये घुसतात, देशभरात त्यांच्या अतिरेकी कारवाया सुरू असतात तरी भारतानं कधी पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही. अरे आफ्रिदी हा दिलदारपणा तुला कसा दिसत नाही ?
    अगदी बरोबर.

    ReplyDelete
  2. या पाकड्या कडून कधी चांगले बोलले जायील का ? हे यांची लायकी दाखविल्याशिवाय राहणार नाहीत...असो...
    पण ब्लॉग आवडला...मस्त...शुभेच्या...

    ReplyDelete