Friday, February 5, 2010

राहुल गांधी ! महाराष्ट्र धर्म तुडवावा

अखरे राहुल गांधी यांची मुंबई भेट पार पडली. या भेटीचं नियोजन अगदी योग्य प्रकारे करण्यात आलं होतं. नुसतंच नियोजन नव्हे तर या भेटीसाठी वातावरण निर्मितीही करण्यात आली होती. मुंबईत येण्याआधीच राहुल गांधी यांनी बिहार - युपीच्या भैय्यांनी मुंबईचं रक्षण केलं असं वक्तव्य बिहारमध्ये केलं. अर्थातच हे वक्तव्य मराठी जनतेला डिवचण्यासाठी होतं. अर्थात शिवसेना वगळता इतर मराठी मंडळी शांतच राहिली. मात्र शिवसेनेनं राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधींनी एकाच वेळी युपी - बिहारी भैय्यांना खुश करून उत्तर भारतीय वोट बँक आणखी मजबूत करत, बिहारमध्येही तिचा उपयोग करून घेण्याची चाल यशस्वीपणे खेळली. इतकंच नव्हे तर घाटकोपरला रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जाऊन आपली हक्काची दलित वोट बँकही जपण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं.
बरं हे राहुल बाबा मुंबईचा दौरा ठरल्याप्रमाणे करता अवखळ बाळाप्रमाणे कुठेही कसेही फिरलं. आता या राहुल 'भैय्या'ला खरोखरच लोकलने फिरायचं होतं की शिवसेनेच्या आंदोलनामुळे मार्ग बदलावा लागला हा प्रश्न येथे निर्माण होतो. इकडे राहुल बाबाचा लोकलमध्ये प्रवास सुरू होता. आणि तिकडे राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना घाम फुटला होता. कारण शिवसैनिकांचे 'झेंडा' आंदोलन चिघळलं तर कसाब कृपेने मिळालेले मुख्यमंत्रीपद जाण्याचाही धोका निर्माण झाला होता. मात्र सरकारने शिवसेनेच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली होती. जणू शिवसैनिक काळे झेंडे नव्हे तर धोंडेच बरसवणार होते की काय ? असा सरकारचा समज झाला होता. मग त्यासाठी पूर्ण मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली. या निमीत्ताने सुरक्षा व्यवस्था काय असते हे ही 'आम आदमी'ला कधी नव्हे ते दिसून आलं. अशोकराव आता एक करा तुमच्या सरकारचं किमान अस्तित्व जनतेला जाणावं यासाठी तरी ही सुरक्षा व्यवस्था कायम ठेवाच.
बरं आता आपण पुन्हा वळू यात राहुल गांधींच्या दौ-याकडे. राहुल गांधींनी केलेला लोकल प्रवास हा खुद्द त्यांच्यासाठी फार काही नवलाचा विषय नसेल. कारण राहुल गांधी मागील अनेक दिवसापासून देश जाणून घेण्यासाठी देशभर फिरत आहेत. दूरवरच्या गावात मुक्काम करत आहेत. गरिबाच्या घरी जेवण करत आहेत. आता त्यांना अजून किती देश जाणता आला ते काही कळायला मार्ग नाही. मात्र त्यांनी लोकलमध्ये प्रवास करणं यात काही वेगळं नाही. कारण असे 'गांधी छाप' आंदोलन ही गांधी - नेहरू घराण्याची मिरासदारीच आहे. सोनिया गांधीही अनेकदा अशाच ' आम आदमी 'बरोबर संवाद साधत असतात. राहुलही, सोनियाजी आता बस कराही नाटकं. वाढत्या महागाईमुळे 'आम आदमी'चं पोट खपाटाला गेलं आहे. त्यासाठी काय करणार आहात ते सांगा ? आणि त्यानंतर ही नौटंकी करा.
राहुल गांधींच्या मुंबई भेटीमुळे अशोक चव्हाण यांच्या वडिल शंकरराव चव्हाण यांचा जोडे उचलण्याचा वारसा त्यांच्या चिरंजीव अशोक चव्हाण यांच्या मंत्रीमंडळाने सुरू ठेवल्याचंही स्पष्ट झालं आहे. गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी राहुल गांधी यांचे जोडे मस्तकावर ठेवून महाराष्ट्राची मान पुन्हा उंचावली आहे. अरे थू तुमच्या जिंदगानीवर. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथे मागील रांगेत औरंगजेबाने मागे उभं केल्यावर तिथं न थांबण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज त्याच स्वाभिमानी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात ही कणा नसलेली जात निर्माण झाली आहे. दिल्लीश्वरांचे पाय चाटणे हीच काय त्यांची कर्तबगारी.
या निमीत्ताने इंग्रजी आणि हिंदी मीडिया हा विकला गेला आहे की काय ? किंवा मुंबई तोडण्याच्या कटात तेही सामील झाले आहेत ? अशी शंका उपस्थित होते. काळे झेंडे दाखवण्याचे साधे आंदोलन असताना त्याला ठाकरे आणि गांधी युद्धाचं स्वरूप देऊन, थेट राहुल गांधी यांना विजेता ठरवण्यात आलं. या इंग्रजी - हिंदी चॅनेल्सची मळमळ या निमीत्ताने बाहेर पडली. त्यांना मराठी माणूस, शिवसेना यांच्यावरचा द्वेषही दिसून आला. हे इंग्रजी - हिंदी चॅनेल्स कमी होते की काय, म्हणून मराठीतले बाटगे 'लोकमळ'ने ही त्याचा कंडू या निमीत्ताने शमवून घेतला. मात्र या निमीत्ताने मराठीचा अपमान झाल्यावर रस्त्यावर कोण उतरतं आणि कोण अपमान करणा-यांचं स्वागत करतं हे सिद्ध झालं. राहुल गांधींनी भाईदास हॉलमध्ये मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला. आता तरी काँग्रेसवाले जागचे हलणार आहेत का ?

खमंग फोडणी - आता पुढच्या आठवड्यात शाहरूख खानचा 'माय नेम इज खान' प्रदर्शित होणार आहे. या खानाचे गांधींबरोबर चांगलेच सूत जमलेले आहे. त्यामुळे दिल्लीश्वरांच्या आशिर्वादामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या प्रेमात पडलेल्या या खानाने अजूनही माफी मागितलेली नाही. त्यामुळे या खानासाठी पुढिल आठवड्यात पुन्हा एकदा काँग्रेसी बाटगे त्यांची प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत. मराठी माणसाच्या अपमानानंतर शिवसेना रस्त्यावर उतरली. आता तर राष्ट्राचा अपमान या खानाने केलाय. त्यामुळे त्याचा मोठा सत्कार व्हायला हवा. त्याचा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी सैन्याला बोलवावं लागलं तरी बेहत्तर मात्र धर्मनिरपेक्षता आणि हा मुजोर खान सुरक्षीत राहिली पाहिजे. या विरोधात कोणीही बोलू नका नाही तर तुम्ही जातीयवादी ठराल. जय हो. जय हो. जय हो.

5 comments:

  1. तुम्ही म्हणता तशी ही कणा नसलेली जात आपल्यात जास्त संख्येनं निपजल्यानं...हे राज्य श्रीच्या इच्छेतल आणि स्वप्नातलं तर नक्कीच नसेल आणि जोडे उचलणारे महाराजांचे मावळेही नसतील...बाकी राहीले वागळे तर ही पत्रकारीता आहे की वागळेकारिता हे जनतेला सांगणे न लागे..नेहमीप्रमाणे हाही विषय वाचनीयच आहे.

    ReplyDelete
  2. पाकिस्तानी क्रिकेटपटू आयपीएलमध्ये हवेत, असं म्हटल्यानं देशाचा अपमान कसा काय होतो, ते एकदा स्पष्ट करशील तर बरं होईल. २६/११ चा हल्ला हा काही पहिला नव्हता. स्वातंत्र्यापासूनच पाकिस्तानबरोबर वैर सुरु आहे. म्हणून काही खेळ, कला या गोष्टी थांबत नाहीत. शाहरुख 'खान' आहे म्हणून तो मुजोर, याला काय अर्थ आहे? पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतात खेळले नाहीत म्हणजे काही सीमेपलिकडच्या कारवाया थांबणार नाहीत. किंवा क्रीडापटूंना खेळू दिले नाही, हा काही मोठा पराक्रम नव्हे. डेक्कन चार्जर्सने अब्दुल रझ्झाकला करारबद्ध करण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या, मग त्यांच्यावर काहीच आक्षेप नाही, कारण त्याचे मालक खान नाहीत. शिवसेना फक्त मराठीचे राजकारण करत आहे, तेही मनसेपेक्षा आपण जास्त कडवे हे दाखवण्याचा हा प्रकार आहे. शिवसेना मराठी माणसाच्या रक्षणासाठी आहे असे असेल तर मनसेच्या अस्तित्वाचा काय अर्थ होतो तेही स्पष्ट कर. राहता राहिला प्रश्न राहुल गांधीचा. राहूल गांधीनं शिवसेनेवर टीका केली, मराठी माणसावर नाही. आणि शिवसेना म्हणजे मराठी माणूस नव्हे. जर शिवसेना म्हणजेच मराठी माणूस असं तू म्हणत असशील तर यासारखा मराठी माणसाचा अपमान दुसरा नाही.

    ReplyDelete
  3. Aho Santosh Garu Tumache Nete 'Balasaheb' he dhekhil Miyadad sobat jevale...to manuha ha kon he mahit asunhi...mag te rashtradrohi zale ka? ani senene ji nidarshane keli ti puski hoti ase mhanave lagel....

    ReplyDelete
  4. राहुल गांधींच्या दौ-याच्या प्रसंगी राज्य सरकार अतिशय सतर्क होते. अशीच सतर्कता त्यांनी नेहमी दाखवली तर राज्यातले सर्वच प्रश्न सुटतील.
    पण वारंवार भावनिक मुद्यांवर लोकांची माथी भडकवणारी आंदोलने शिवसेना किती काळ करणार ? शिवसेनेच्या ताज्या आंदोलनाला सामान्य नागरिकांचा प्रतिसाद त्यामुळेच मिळाला नाही. या अनुभवातून शिवसेना शहाणी होणार का ?

    ReplyDelete