Friday, February 12, 2010

'धर्म'निरपेक्षताही अफूची गोळी

वरती केलेलं हे विधान कोणतंही सेवन न करता अक्कल हुशारीने केलेले विधान आहे. आणि हे विधान करण्यापूर्वी अर्थातच कार्ल मार्क्सच्या आत्म्याची क्षमा मागितलेली आहे. 'धर्म' ही अफूची गोळी असल्याचं जगानं मान्य केलं, हा इतिहास आहे. मात्र 'धर्म'निरपेक्षताही सुद्धा अफूचीच गोळी आहे, असा सिद्धांत प्रस्थापित होणार असल्याचं आपल्या देशातल्या घटना पाहिल्यानंतर स्पष्ट होतं. कारण आपल्या देशात धर्मनिरपेक्षतावाद्यांनी जितका धर्माचा (गैर)वापर केला आहे, तेवढा कोणीच केलेला नाही. शाहरूखला पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या प्रेमाचा उमाळा येऊनही धर्मनिरपेक्षतावाद्यांनी अजून तरी तोंड उघडलेले नाही. शिवसेना वगळता कोणत्याच पक्षाला यात काहीच वावगं दिसत नाही. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंसाठी शाहरूखचा जीव तुटतोय. मात्र आपण काही चूक केली असं त्याला वाटत नाही.
मुख्यमंत्री की 'खान'सामा
प्रियंका, राहुल यांचा यार असलेल्या 'खान'दोस्त साठी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एक तर गांधी कुटुंबियांचा यार आणि त्यातच मुसलमान म्हटल्यावर काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागणं सहाजिकच होतं. त्यामुळे गांधी घराण्याच्या धर्मनिरपेक्षतेची 'चव' बिघडू नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणा किंवा 'खान'सामा म्हणा कामाला लागले. खानाच्या चित्रपटाला सुरक्षा देण्यासाठी चित्रपटगृहांना पोलीस संरक्षणाचा गराडा पडला. दिल्लीश्वर गांधींना खुश करण्यासाठी खानाच्या चित्रपटाला विरोध करणा-या शिवसैनिकांवर पोलीस तुटून पडले. अर्थात पोलीस बिचारे तरी काय करणार ? मुंबईवर हल्ला होतो, हेडली दोन वर्ष इथं राहतो, हे त्यांना कळत नाही. मात्र या निमीत्ताने का होईना निशस्त्र शिवसैनिकांवर दांडके आपटून तेवढीच सरकारी मर्दूमकी बजावल्याचं त्यांना समाधान मिळालं. मुख्यमंत्र्यांनी या निमीत्ताने खानाचे 'जोडे' उचलून एक वर्तूळ पूर्ण केलं. अर्थात महाराष्ट्रात राज्य करायचे असेल तर काँग्रेसवाल्यांना गांधी आणि खानांचे जोडे उचलावेच लागणार हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला क्षमा करा
स्वराज्याच्या मुळावर आलेल्या अफजल खानाचा याच राज्यात शिवाजी महाराजांनी कोथळा काढला होता, हा इतिहास आहे. मात्र इथे तर देशाच्या अस्मितेवर चालून आलेल्या खानासाठी पायघड्या टाकण्यात येत आहेत. स्वराज्यावर चालून आलेला अफजल खान आणि अस्मितेवर चालून आलेला शाहरूख खान यांच्यात फरक तो काय ? या खानांमध्ये काय फरक आहे ? तो स्पष्ट दिसतोच आहे. मात्र ही असली खानावळ मोडून काढण्यासाठी राज्यकर्त्यांमध्ये ताकद असायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढून, त्याची कबर बांधली. ( नंतर धर्मांध मुस्लिमांनी ट्रस्ट स्थापून त्याचे उदात्तीकरण केले. अर्थात काँग्रेसने अजूनही कबरीला संरक्षण देऊन त्यांचा 'हात' कुणाबरोबर आहे, हे दाखवून दिलं. ) मात्र इथे तर पाकिस्तान प्रेमाचा उमाळा आलेल्या शाहरूखच्या चित्रपटाला विरोध करणा-यांची डोकी फोडण्यात आली. शिवाजी महाराज आम्हाला क्षमा करा. कारण आता राज्य हे स्वाभिमानाने नव्हे तर लाचारीने आणि अल्पसंख्यकांच्या मताने चालवण्याचे दिवस आले आहेत.
त्यांची धर्मनिरपेक्षता आमच्या धर्माचे काय ?
धर्मनिरपेक्षता नव्हे तर वॉट बँक जपण्यासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जावू शकते यात शंका नाही. देशाविषयी गरळ ओकणा-यांची थुंकी ही त्यांना गोड आहे. काँग्रेस असो वा कोणतेही राजकीय पक्ष यांना सत्ता जपायची आहे. किंवा सत्तेत यायचं आहे. त्यासाठी त्यांना गरज आहे ती मुस्लीम वोट बँकेची. त्यासाठी मुस्लीमांना वाईट वाटू नये, याच एकसुत्री कलमाचे पालन ते करत असतात. शाहरूख असो अथवा कुणी इतर अल्पसंख्यांक यांच्या चूकीच्या वक्तव्याचा किंवा कृतीचा ते कधीच निषेध करणार नाहीत. त्यांच्यावर ते कधीच नेम धरणार नाहीत. अर्थात हे शिवधनुष्य पुचाट काँग्रेसवाल्यांना पेलणंही शक्य नाही. त्यामुळे अशा अस्मितेच्या प्रश्नांवर डोकी फोडून घ्यायची असतील तर स्वराज्याची पताका फडकावणा-या शिवाजी महाराजांचे वारसदारच पुढे येणार. त्यांच्या शिवाय कुणात आहे हा दम ?

खमंग फोडणी - लादेन नंतर जगातला दुस-या क्रमांकाचा लोकप्रिय मुसलमान, असं स्वत:ला म्हणवून घेणारा शाहरूख काँग्रेसला कशासाठी प्रिय असेल ? तर तो लोकप्रिय स्टार आणि मुस्लिम असल्यामुळेच. मात्र शाहरूखनेही काँग्रेसवर विश्वास ठेवण्याच्या आधी अमिताभ बच्चनचा किस्सा लक्षात ठेवावा. अमिताभ बच्चनच्या लोकप्रियतेचा निवडणुकीत काँग्रेसने फायदा उठवला. आणि नंतर त्याच अमिताभला 'बोफोर्स'च्या तोंडी दिलं. आज उदोउदो करणारे हेच काँग्रेसवाले उद्या त्याला कशाच्या तोंडी देतील याचा 'नेम' नाही.

4 comments:

 1. धर्म ही अफूची गोळी आहे, या तर्कावर सत्य उतरलेल्या विधानाची मोडतोड करण्यापासूनच संपूर्ण ब्लॉगमध्ये सत्याशी आणि तर्काशीही फारकत घेतली आहे. काय म्हणावं याला?

  ReplyDelete
 2. या देशाचे जेवढे नुकसान धर्मांध व्यक्तीने केलंय..त्यापेक्षा कितीतरी अधिक या बेगड्या धर्मनिरपेक्ष व्यक्तींनी केलंय.. नवीन तर्क पटला. धर्मनिरपेक्ष व्यक्तींबरोबरच बोगस एनजीओवादी व्यक्तीही देशात मोठ्या प्रमाणात बोकळल्यात ( मानवअधिकारवादी मंडळी ) या व्यक्तींवरही एखादा ब्लॉग लिहावा.

  ReplyDelete
 3. आपण लेनिनग्राडला निघाला होतात पण सापडलात त्रिनिदाद येथे... आपल्या संपुर्ण प्रवासात होकायंत्र पार बिघडून गेलंय बघा...

  ReplyDelete
 4. Ek vyakti gund ahe mhanun tyacha bhau, mulga, pannatu gundach astat, asa mhanta yeil ka... tyachpramane ek aurangjeb kiva afjalkhan hota mhanun sagalech muslim akach jatiche mhanta yeil ka....

  ReplyDelete