Wednesday, January 23, 2013

शिवसेनाप्रमुखांशिवाय, २३ जानेवारी !
२३ जानेवारी आमच्या शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिवस. मात्र शिवसेनाप्रमुखांशिवाय आलेली ही पहिली २३ जानेवारी आहे. सुभाषचंद्र बोस यांची आजच्याच दिवशी जयंती असते. दोन वाघांचा जन्मदिवस एकच असणे हा ही विलक्षण योगायोग म्हणावा लागेल. १७ नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुखांचं महापरिनिर्वाण झालं. या जगात देवानाही मरण चुकलं नाही. मात्र शिवसेनाप्रमुख आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही. शिवसेनाप्रमुखांना निरोप देण्यासाठी उसळलेल्या सागराचा मी ही एक थेंब होतो. ज्या शिवतीर्थावर माझ्या दैवताची भाषणं मी ऐकली, त्याच शिवतीर्थावर त्यांना निरोप द्यावा लागला. चितेच्या ज्वाला विझत आल्या तरी माझ्या सारखे शेकडो शिवसैनिक शिवतीर्थावरच बसून होते. धगधगणारी ती चिता पाहत असताना शिवसेनाप्रमुखांच्या भाषणातील विचारांचे अंगार कानात गुंजत होते. पोकळी म्हणजे काय याचा खरा अर्थ या वेळी लक्षात आला. जगभरातल्या माध्यमांनी या सर्वांची घेतलेली दखल शिवसेनाप्रमुखांची महती सांगण्यासाठी पुरेसा आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांकडे सगळ्या देशाचं लक्ष असायचं. कारण हिंदूंचा एकमेव हिंदूहृदयसम्राट म्हणजे शिवसेनाप्रमुखच. कारण देशातल्या धर्मनिरपेक्षतेनं इथल्या हिंदूंना मुर्दाड, भ्याड, मार खाणारा बनवलं होतं. या भारत भूमीत हिंदूंचं स्फूलिंग चेतवणारे दोनच वीर जन्माले आले. पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्राच्या भूमीतच त्यांनी घडवलेला इतिहास जगाच्या कानाकोप-यात पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मोघल, आदिलशाही या इस्लामी राजवटींना धूळ चाखावी लागली. शिवाजी महाराजांमुळेच देशात हिंदू धर्म टिकला. नसता आज या भूमीवर सगळेच डोक्यावर गोल टोप्या घालून फिरले असते. टोप्यांबरोबर बोनस म्हणजे सुंता ही झाली असती. मात्र शिवाजी महाराजांनी इस्लामी राजवटींना टक्कर देत हिंदवी स्वराज्य निर्माण केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतरची इंग्रजांची राजवट आणि स्वातंत्र्यानंतर देशात सत्तेत आलेली काँग्रेस यांनीही हिंदूंचं खच्चीकरणच केलं. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांच्या दाढया कुरवाळून देशाची सुरक्षा धोक्यात टाकली. काँग्रेसच्या या कृतीवर बोलणारा एकही नेता देशात नव्हता. मात्र शिवसेनाप्रमुखांच्या रूपाने हिंदूंना नेता मिळाला. छदमी धर्मनिरपेक्ष नेते, पाकधार्जिणे मुस्लिम, दहशतवादी, पाकिस्तानी नेते या सर्वांना फटकावणारा एकच आवाज होता, तो फक्त शिवसेनाप्रमुखांचाच. अमरनाथ यात्रा उधळण्याची धमकी देणा-या दहशतवाद्यांनाही धाक होता तो शिवसेनाप्रमुखांचाच. अमरनाथ यात्रा उधळली तर मुंबईतून एकही मुस्लिम हज यात्रेला जावू देणार नाही, असा दम दिल्यानंतर सगळे दहशतवादी सुतासारखे ( सुंता सारखे नव्हे ) सरळ झाले होते.

एमआयएम या पक्षाच्या नेत्यांची वक्तव्यं सध्या चर्चेत आहेत. अर्थात शिवसेनाप्रमुख जर असते तर त्यांनी एमआयएमचा खास ठाकरी शैलीत समाचार घेतला असता. "कोण तो बकरूद्दीन की अकबरूद्दीन, हा लांडा फार बडबड करतोय. या देशात रहायचं असेल तर नीट रहा. नसता पाकिस्तानची वाट धर'', असं शिवसेनाप्रमुखांनी सुनावलं असतं.

जातपात न मानणारे शिवसेनाप्रमुख, सामान्यांना सत्तेत बसवणारे शिवसेनाप्रमुख अशा कितीतरी रुपातले शिवसेनाप्रमुख अनेकांना भेटले. त्यांनी अनकांचं जीवन घडवलं. शिवसेनाप्रमुख म्हणजे या देशातल्या सामान्यांचा आवाज होते. सामान्यांच्या व्यथा त्यांच्या भाषणात असायच्या. सामान्यांच्या मनात भ्रष्ट राजकारणी, दहशतवादी, जातीयवादी आणि दंगलखोर मुस्लीमांच्या विरोधात असणा-या भावना शिवसेनाप्रमुखांच्या ठाकरी भाषेतून व्यक्त व्हायच्या. सणासुदीच्या दिवशी सामना वाचताना, शिवसेनाप्रमुखांचा शुभेच्छा संदेशाची आठवण येते. गुरूपौर्णिमा, २३ जानेवारी या दिवशी शिवसेनाप्रमुखांची शिवसैनिकांना हात दाखवणारी प्रतिमा आठवते. हीच प्रतिमा, शिवसेनाप्रमुखांचा विचार माझ्या सारख्या लाखो शिवसैनिकांच्या मनात जतन आहेत. त्यामुळेच देहरूपाने जरी शिवसेनाप्रमुख आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांनी ते आपल्यातच आहेत...आपल्यातच आहेत...

No comments:

Post a Comment