नेहमीच वादात अडकणाऱ्या लेखिका शोभा डे यांच्या विरोधात ट्विटरवर जोरदार ट्रेंड सुरू आहे. पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डे यांनी भारत सरकारच्या विरोधात लेख लिहल्याची धक्कादायक माहिती उच्चायुक्तपदी राहिलेले अब्दुल बासित यांनी दिली. परिणामी शोभा डे यांचा देशभरात निषेध केला जात आहे. ट्विटरवर तर नेटिझन्स शोभा डे यांचा खरपूस समाचार घेत आहेत.लेखिका शोभा डे यांच्यावर सोशल मीडियात ट्रोल होण्याची वेळ आली. ॲंटी नॅशनल असा शब्द वापरण्याऐवजी 'आंटी नॅशनल' अशा शब्दात शोभा डे यांची खिल्ली उडवली जातेय. शोभा डे यांचं लिखाण तसं थ्री पेज कल्चरमध्येच वाचलं जातं. त्यांचा कोणताही लेख संपूर्णपणे वाचायचा म्हटला तरी वाचला जात नाही, इतकं ते सुमार दर्जाचं असतं. मात्र पाकिस्तानसाठी लिहलेल्या, 'Burhan Wani is dead but he'll live on till we find out what Kashmir really wants' या लेखासाठी शोभा डे यांनी चांगलीच
मेहनत घेतली. एकंदरीतच त्यांचा लिखाणानाचा आवाका पाहता, लेखाची स्क्रिप्टही पाकिस्तानातूनच तर आली नाही ना ? अशीही शंका मनात येते. बुऱ्हाण वाणीवर लिहलेला हा पाकमय लेख द टाईम्स ऑफ इंडियानं छापला होता. 17 जुलै 2016 रोजी टाईम्स ऑफ इंडियानं छापलेला लेख, त्यांनी का छापला ? असाही प्रश्न आता उपस्थित होतोय.बुऱ्हान वाणीला ठार मारल्यानंतर अब्दुल बासित यांनी भारतीय पत्रकारांची भेट घेतली. त्या भेटीत डे यांना लेख लिहण्याविषयी विनंती करण्यात आली. ती विनंती त्यांनी मान्य करून डे यांनी लेख खरडल्याचं बासित यांनी सांगितलं. तर अब्दुल बासित यांची एकदाच भेट झाल्याचं शोभा डे यांनी सांगितलं. मात्र बासित पूर्णपणे खोटं बोलत असल्याचं स्पष्ट करत, हा माझा अपमान असल्याचं शोभा डे म्हणाल्या आहेत.
भारतातले लेखक पाकिस्तानच्या इशाऱ्यावर लिखाण करत असतानाच दुसरीकडे पाकिस्तानचीही शोभा झाली. काश्मीरच काय तर पाकिस्तानही भारताचा भाग आहे. भारत हा इस्लामपेक्षाही जुना आहे मान्य करायला हवं, असं मत ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी व्यक्त केलं. काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानला कोणत्याही देशाकडून मदत मिळत नाही. त्यातच ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी पाकिस्तानचा बुरखाच फाडला. "पाकिस्तान आणि काश्मीर दोन्ही भारताचेच भाग आहेत. तिथले हिंदू त्यांचा धर्म सोडून इस्लाममध्ये आले असले तरी संपूर्ण भूभाग हा हिंदूंचा आहे. हे सत्य बदलता येणार नाही. भारत हा पाकिस्तानच काय तर इस्लामपेक्षा जुना आहे. हे मान्य करायलाच हवं", अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानचा नक्शा उतरवला.ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असणाऱ्या तौवहिदी यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. तसंच या मुद्यावरून त्यांनी काँग्रेसवर टीकाही केली होती. "राहुल गांधी हे अत्यंत वाईट राजकारणी आहेत. मोदींना विरोध करण्यासाठी ते शत्रूंची सोबत करतात. सोनिया गांधीही तशाच आहेत. गाझामधील कट्टरतावाद्यांशी असलेले त्यांचे संबंध विसरता येणार नाहीत. हे दोघे स्वत:च्या स्वार्थासाठी काम करतात आणि नंतर कॅमेरासमोर येऊन रडतात. हे मुरब्बी राजकारणी नाहीत," असा आरोप तौवहिदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केला होता. एकंदरीतच कलम ३७० वरून भारताला जगभरातून समर्थन मिळत असताना पाकिस्तान एकाकी पडलाय. तर इस्लामी नेत्यांनीही समर्थन केल्यानं भारताचं पारडं जड झालंय. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानला अमेरिका, चीनसह कोणत्याचा देशाचा पाठिंबा मिळताना दिसत नाही. इस्लामी देशही पाकिस्तानसोबत नाही. यामुळे पाकिस्तानचं वैफल्य वाढत चाललंय.
एकंदरीतच पाकिस्तानच्या अब्दुल बासितमुळे डे यांची शोभा झाली. तर इमाम मोहम्मद तौवहिदी यांच्यामुळे पाकिस्तानची शोभा झाली. आता झालेल्या या शोभेमुळं तरी डे आणि पाकिस्तानला काही अक्कल यायला हवी, हीच सदिच्छा.

No comments:
Post a Comment