Saturday, June 9, 2012

गुन्हेगारांना जातच नव्हे तर धर्मही असतो !


धर्मनिरपेक्षतावाद्यांची माफी न मागता या लेखाचं शिर्षक छातीठोकपणे लिहलंय. आणि एकदा का काही लिहलं त्यापासून मागे हटायचं नाही, हा आपला बाणा. अर्थात नंतर काही खुलासा वगैरे करावा लागू नये यासाठी हा प्रपंच. जगात इस्लामी राज्य आणण्यासाठी कित्येक लाख मुस्लिम युवक जिहादची आरोळी देत जगभरात दहशतवाद पसरवत आहेत. मात्र आपलं येवून - जावून 'दहशतवादाला जात नसते' हे वाक्य काही केल्या 'जात' नाही. सर्व धर्मनिरपेक्षतावाद्यांचं 'एकजात'पणे यावर एकमत आहे.
मात्र टाटा इन्सटिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या (टीआयएसएस) एका रिपोर्टमधून बाहेर आलेलं सत्य या लेखाच्या शिर्षकाला पृष्टी देणारं आहे. राज्यातल्या तुरूंगात असलेल्या कैद्यांपैकी 36 टक्के कैदी हे मुस्लिम आहेत. टीआयएसएसनं राज्यातल्या पंधरा तुरूंगातली आकडेवारी सादर करून हे तथ्य मांडलंय. 3 जून 2012 रोजी टाईम्स ऑफ इंडियाच्या अंकात पान नंबर सहावर त्याविषयीची सविस्तर बातमी छापून आली आहे. 36 टक्के गुन्हेगार मुस्लिमांमध्ये निरक्षरांची टक्केवारी ही 31.3 % इतकी आहे. 61.8 % गुन्हेगारांनी प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे. आणि पोस्ट ग्रॅज्यूएटपर्यंत पोचतानी ही टक्केवारी 0.1 % अशी तळाला पोचतेय.
उत्पन्नाच्या साधनांची आणि संधीची कमतरता, असल्यामुळे मुस्लिम युवकांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त असल्याचंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. तसंच निरक्षरता आणि अल्पशिक्षणामुळेही या युवकांना संधी मिळत नाहीत, हे ही आकडेवारीवरून स्पष्ट होतं. त्यामुळे सरकारने मुस्लिमांमध्ये शिक्षणाची जागृती करणंही गरजेचं आहे. मात्र मुस्लिम वस्त्यांमध्ये वाढणारे मदरसे आणि त्यात
जाणा-या युवकांची संख्या बघता त्यांना व्यावसायिक आणि पारंपरिक शिक्षणाची गोडी नसल्याचंच स्पष्ट होतं. धार्मिक शिक्षणातच रस
असणा-यांची गाडी नंतर गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या वाटेवर गेली नाही तर त्यात नवल ते काय ?
राज्यातल्या शेतक-यांची अवस्था पाहिली तर खेड्यांमधूनही गुन्हेगारांची फौज उभी राहावी अशी परिस्थिती आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतक-यांच्या मुलांसमोर असलेलेली पारंपरिक उत्पन्नाची साधनं आधी सारखी भरवश्याची राहिलेली नाहीत. कोरडवाहू शेतीमधून खर्चही वजा होत नाही. शेतक-यांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. शेतकरी त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षणही देऊ शकत नाही. म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतक-यांची मुलं गुन्हेगार झाली नाहीत. परिस्थितीपुढं हारलेल्या शेतक-यांनी आत्महत्या केली, पण गुन्हेगारीची शस्त्र उचलली नाहीत. आता जातीचाच मुद्दा आला आहे, तर स्पष्टीकरणासाठी एक धक्कादायक उदाहरण देतो. विदर्भामध्ये जितक्या आत्महत्या झाल्या त्यातले नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी हे कुणबी मराठा होते. म्हणजे हजारो कुणबी शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. कारण गुन्हेगारी ही त्यांचा जातीत नाही.
http://santoshgore.blogspot.in/2010/05/blog-post_07.html#comment-form
याच ब्लॉगवर वरील लिंकवर आपल्याला 'तुरूंगातली धर्मांतरे आणि  आमची जात' या दोन वर्षांपूर्वी लिहलेल्या लेखातही असंच विदारक सत्य वाचायला मिळेल.
आता राहता राहिला प्रश्न सरकारच्या मानसिकतेचा. गुन्हेगारांना जात नसते, या वाक्यानं फार तर मनाचं समाधान करता येईल. पण त्यामुळं वास्तव काही बदलत नाही. आणि वर मांडलेली आकडेवारी काही खोटं बोलत नाही.