साला एक कॉक्रोच स्टुडन्ट को क्रांतीकारी बनाता हैं, एखाद्या सिनेमात हा डायलॉगही होऊ शकेल. त्याचं कारणही तसंच आहे. देशातील तरूणांच्या मनातील असंतोषाला आंदोलनाचं रूप देण्याचं काम कॉक्रोचनं केलं. सीजेआय सूर्यकांत यांनी युवकांच्या बाबत कॉक्रोच असा उल्लेख केल्यामुळे तरूणाई धुमसत होती. त्यातच जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील याचिकेवर तातडीची सुनावणी नकार देताना सूर्यकांत यांनी "Please don't waste our time" अशी टिप्पणी केली. त्यावरही वेगवेगळ्या प्रतक्रिया उमटत आहेत.
नीटसह इतर परीक्षांच्या पेपरफुटीच्या मालिकेमुळे लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षाव्यवस्थेवरील विश्वास आधीच डळमळीत झाला होता. वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या भविष्याबद्दल असुरक्षित वाटू लागले होते. पेपरफुटी हा केवळ परीक्षा व्यवस्थेचा प्रश्न राहिला नाही, तर तो न्याय, समान संधी आणि विश्वासाचा प्रश्न बनला होता.

याचदरम्यान, सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले. त्यामध्ये गणवेशात नसलेले, गुंडांसारखे दिसणारे काही जण विद्यार्थ्यांना काठ्यांनी मारहाण करत होते. एका व्हिडीओत काही पोलिस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनी असलेल्या आंदोलनकर्त्यांशी अयोग्य वर्तन केलं. मुलीच्या पार्श्वभागाला काठी लावून पोलीस हसत होते. काही विद्यार्थिनींचे कपडेही फाटले होते. यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला. त्यानंतर विद्यार्थी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. इन्स्टाग्रामवर वेगवेगळे व्हिडीओ टाकून त्यांनी त्यांची कल्पकता दाखवून दिली. लक्षवेधी बॅनरच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधाऱ्यांनी प्रश्न विचारले.
मुंबईत तर विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणारा पोलिसांचा व्हिडीओ आगीत तेल टाकणारा टाकला. खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती उघड झाल्यानं, विद्यार्थ्यांच्या संतापात भर पडली.
या सर्व घटनांची साखळी पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट होते, विद्यार्थी केवळ पेपरफुटीविरोधात रस्त्यावर उतरले नाहीत. तर त्यांना वाटणाऱ्या अन्याय, अपमान आणि दडपशाहीविरोधात त्यांनी आवाज उठवला.
Gen Z ही पिढी फक्त मोबाईल, रिल्स आणि सोशल मीडियापुरती मर्यादित आहे, अशी टीका केली जायची. मात्र या आंदोलनानं वेगळंच चित्र दाखवलं. हीच युवा पिढी हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरली. आंदोलनात सहभागी झाली. सोशल मीडियावर लाईक्स आणि शेअर पुरतीच मर्यादित असलेली ही युवा पिढी प्रश्न विचारायला लागली. त्यांच्या भविष्याबद्दलची चिंता सार्वजनिकपणे व्यक्त करायला.
लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज हा केवळ विरोधाचा आवाज नसतो. तो समाजाच्या भविष्यातील दिशेचा स्पष्ट संकेत असतो. त्यामुळे आंदोलनाकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहण्यापेक्षा, त्यामागील कारणे समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरेल.
आणि त्यामुळेच असं म्हणावं वाटतं की, "साला एक कॉक्रोच स्टुडन्ट को क्रांतीकारी बनाता हैं."
#संगो #GenZ #कॉक्रोच
No comments:
Post a Comment