1988 मध्ये एक चमत्कार घडला. त्या वर्षी शाळेतही जात नसलेली तीन-चार वर्षांची मुलं 1 ते 13 अंक घरबसल्या शिकली. कारण त्या वर्षी माधुरी दीक्षितच्या तेजाब सिनेमातलं, एक दो तीन चार...हे गाणं चांगलंच हिट झालं होतं. गाणं आणि सिनेमाही हिट झाला. बॉलिवूडला नवी हिरोईन मिळाली. माधुरीचं त्या सिनेमातलं नाव मोहिनी होतं. त्या मोहिनीची रसिकांवरील मोहिनी आजही कायम आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
तसं पाहिलं तर 1984 मध्ये अबोध सिनेमातून माधुरी दीक्षितचं पदार्पण झालं होतं. पण याचा कोणाला फारसा बोध झाला नव्हता. 11 नोव्हेंबर 1988 ला तेजाब रिलीज झाला आणि धमाकाच झाला. लव्ह स्टोरी, कॉमेडी आणि जबरदस्त फायटिंगचा मसाला असलेल्या तेजाबनं बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम केले. मात्र एक महिना आधीच 21 ऑक्टोबर 1988 रोजी दयावान रिलीज झाला होता. तो सिनेमा जास्त हिट नव्हता, मात्र त्यातलं, 'आज फिर तुम पे प्यार आया है' हे गाणं चांगलंच गाजलं. पण त्या गाण्यात थोराड दिसणाऱ्या विनोद खन्नासोबत माधुरीला पाहणं एखादी शिक्षाच वाटत होती.
मात्र ही शिक्षाही माधुरीचे चाहते लवकरच विसरले. रामलखन, दिल, किशन कन्हैय्या, त्रिदेव, साजन, बेटा, थानेदार, खलनायक, राजा, हम आपके है कोन, दिल तो पागल है, प्रेमग्रंथ, देवदास अशा एका पेक्षा हिट सिनेमांचा धडाकाच माधुरीनं उडवून दिला. साजन सिनेमातलं 'तू शायर है मैं तेरी शायरी', 'बहोत प्यार करते हैं तुमको सनम' या गाण्यानं तर रसिकांना घायाळ केलं. तर बेटा सिनेमातल्या 'धक धक करने लगा', गाण्यानं रसिकांच्या काळजाची वाढलेली धडधड ते गाणं आठवलं की आजही वाढते. रोमँटिक भूमिका, गंभीर भूमिका, कॉमेडी आणि नृत्य या सर्वांमध्ये पारंगत असल्यानं मागील तीन दशकांपासून मा्धुरी दीक्षितची मोहिनी कायम आहे. सिल्व्हर स्क्रीन गाजवणाऱ्या माधुरीनं छोटा पडदाही गाजवला. झलक दिखला जा सारख्या रिअॅलिटी शोची जज म्हणूनही माधुरीनं छाप उमटवली.
सदाबहार माधुरीचे चाहते देशातच नाहीत तर विदेशातही आहेत. माधुरीची ग्रीसमधील फॅन Katerina Korosidou हिचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. माधुरीच्या गाण्यावर Katerina Korosidou हिचं पदलालित्य पाहण्यासारखंच होतं. Katerina Korosidou सारखाच नव्हे पण थोडा वेगळा, असा माझाही किस्सा आहे. 1988 मध्ये मी सहावीत असताना तेजाब सिनेमा आला होता. चित्रहार, छायागीतमध्ये तेजाबमधली गाणी लागायची. सर्व हॉटेल्समध्येही डिंग डाँग डिंग डिंग डाँग डिंग डाँग सुरू असायचं. पण थिएटरमध्ये हा सिनेमा पाहायला मिळाला नव्हता. 1989 च्या उन्हाळ्याच्या मामाच्या गावाला म्हणजेच अंबेलोहळला (ता. गंगापूर) गेलो. तिथं दोन रुपयाचं तिकीट काढून व्हिडीओवर तेजाब पाहिला. (आणि आश्चर्याची बाब म्हणजे व्हिडीओ पार्लरचं नाव अनिल होतं. सिनेमात हिरोही अनिल कपूरच होता.) मग काय सारखी तेजाबमधलीच गाणी म्हणायचो. कह दो की तुम हो मेरी वरणा...हे गाणं नेहमीच म्हणत राहायचो. पण एके दिवशी मला रडायला यायला लागलं. माधुरी इतकी मोठी स्टार. ती मुंबईला राहते. तिच्याशी कधी भेटही होणार नाही, मग लग्न तर लांबच राहिलं. सिनेमात हिरोईनचा खडूस बाप ज्या प्रकारे डायलॉग म्हणतो कहाँ तूम और कहाँ हम त्याप्रमाणे कुठे माधुरी दीक्षित आणि कुठे संतोष गोरे अशी परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही डोळ्यांना धारा लागल्या. मीच माझी समजूत घातली. हळूहळू त्या धक्क्यातून सावरलो. आता मागील 12 वर्षांपासून मुंबईत आहे. पण म्हटलं जाऊ द्या, ती तिच्या संसारात सुखी आहे. आपण आपल्या संसारात सुखी आहोत. उगीच कशाला तिच्या आणि आपल्या संसारात 'तेजाब' टाकायचा ? असा विचार करून थांबलो. पण ते काही का असेना आज 15 मे रोजी माधुरीला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. #संगो #MADHURIDIXIT #HBDMADHURI

No comments:
Post a Comment