मला जेव्हा कळायला लागलं, तेव्हा अमिताभ बच्चन यांचा उतरता काळ सुरू झाला होता. (मला बरंच लवकर कळायला लागलं, हा भाग वेगळा) चित्रपटसृटीतला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाल्यानंतर त्यांच्याविषयी काही लिहावसं वाटलं. बच्चन यांच्या उतरत्या काळानंच सुरूवात करूया.
1988 मध्ये अमिताभ यांचा शहंशाह हा सिनेमा प्रदर्शित झाला. 'रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं', हा डायलॉग आणि 'जाने दे जाने दे मुझे जाना हैं' हे गाणं हिट झालं. पण मिनाक्षी शेषाद्रीसोबत अमिताभ यांची जोडी मॅच होत नव्हती. त्यानंतर जादुगर, तुफान निराशाजनक ठरले. त्यातल्या त्यात बरा निघाला तो आज का अर्जुन. 1990 सालच्या अग्निपथनं अमिताभ बच्चन यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला. अमिताभ नावाची जादू चालली. मात्र अग्निपथ हिट म्हणता येणार नाही. पण त्या नंतरचे अजुबा, अकेला, हम, इंद्रजित फ्लॉप ठरले. हममध्ये तर रजनीकांत, गोविंदा असूनही तो सिनेमा प्रचंड हिट ठरला नाही. त्या नंतरचा खुदा गवाह थोडासा सुसह्य होता. मात्र नंतरच्या काळात आलेले लाल बादशाह, मृत्यूदाता पाहून तर चाहत्यांना धक्काच बसला. मेजर साब, हिंदुस्थान की कसम, कोहरामही आपटले. बडे मियां छोटे मियां थोडा चालला, पण त्याचं क्रेडिट गोविंदाला मिळालं. याच काळातच अमिताभ यांची एबीसीएल कंपनीही तोट्यात गेली. उतरता काळ असेल तर कशातही यश येत नाही.
मात्र जिगरबाज अमिताभ यांनी हार मानली नाही. 3 July 2000 रोजी इतिहास घडला. स्टार प्लसवर कौन बनेगा करोडपती सुरू झाला. टेलिव्हिजनच्या इतिहासात क्रांती झाली. अमिताभ यांची लोकप्रियता पुन्हा प्रचंड वाढायला लागली. प्रश्नोत्तर आणि उत्तर देणाऱ्याला बक्षीस असा हा कार्यक्रम, मात्र तो प्रचंड लोकप्रिय झाला. अजूनही कौन बनेगा करोडपती सुरू आहे. अमिताभ यांची स्पर्धकांसोबत संवाद साधण्याची शैली या कार्यक्रमाचं बलस्थान. स्टार प्लस चॅनेल हिट झालं आणि अमिताभ यांचे सितारेही बुलंद झाले. एक दशक अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या अमिताश यांच्या यशाची दुसरी जबरदस्त इनिंग सुरू झाली. सर्व अपयश धुऊन काढलं.
मोहब्बते, कभी खुशी कभी गम, बागबान, ब्लॅक, पा, बंटी और बबली, सरकार, चिनी कम, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा अनेक सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन यांनी दमदार अभिनय साकारला. सिल्व्हर स्क्रिनवर अमिताभ बच्चन यांनी विजय ही व्यक्तीरेखा अनेकदा साकारली. कारकिर्दीला उतरती कळा लागल्यावरही खचून न जाता, 'विजय'नं बाजी पलटवली. अँग्री यंग मॅन बनून स्क्रिनवर गुंडांना बदडणारा विजय हा प्रत्येकाच्या मनात असतो. त्यामुळेच विजय कधी पराभूत होत नाही. त्यामुळे हेच म्हणावसं वाटतं, 'डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन हैं.'
#संगो #amitabh #falkeaward #kbc

No comments:
Post a Comment