अतिरेकी आदिल दार याचा TIMES OF INDIAनं दिलेल्या बातमीच्या शिर्षकात अतिरेकी असा उल्लेख करण्याऐवजी लोकल यूथ असा उल्लेख करण्यात आला. पुलवामात आत्मघातील हल्ला करणारा, पाकिस्तानात ट्रेनिंग घेतलेला आदिल याला अतिरेकी म्हटलं गेलं नाही. त्यामुळे देशभरात गदारोळ माजला. अनेक जणांनी TIMES OF INDIA बंद करत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं. मी ही TIMES OF INDIA बंद केला आहे.
अतिरेकी आदिल दार याचा व्हिडीओ सगळ्यांनीच पाहिला आहे. त्या व्हिडीओत आदिल दार याचे भारत आणि हिंदू धर्मियांविषयी काय विचार आहेत, हे जगानं पाहिलं आहे. आदिल हा पूर्णपणे कट्टरपंथीय होता. मुलांनी प्रेमात पडू नये, असं तो म्हणायचा. काश्मीरमध्ये काही दहशतवादी मुलींच्या प्रेमात पडून लष्कराच्या हाती लागले होते. यामुळे तो असं म्हणायचा. तसंच व्हॅलेंटाईन डे हे काही इस्लामला अनुसरून नाही. त्यामुळेही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा हल्ला घडवून आणण्याचा त्याचा हेतू असू शकतो. तसंच महिलांनी बुरख्यातच राहावं अशी त्याची बुरसटलेली जिहादी विचारसरणी होती. इतकंच नव्हे तर माझ्या मृत्यूनंतर जल्लोष करा, असंही तो त्याच्या नातेवाईकांना सांगायचा. आत्मघाती हल्ला केल्यानंतर जन्नत मिळते, असा या जिहादी श्वापदांचा समज आहे. आणि खरंच असं असेल तर जगातल्या सर्व जिहादींनी एकाच वेळी त्यांच्या राहत्या घरात स्वत:ला बॉम्बने उडवून टाकावं. म्हणजे त्यांना जन्नत मिळेल. आणि ती घाण संपल्यामुळे या पृथ्वीचा स्वर्ग होईल.
आदिल हा पाकिस्तानात एक वर्षापासून ट्रेनिंग घेत होता. संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अफझल गुरू याला नऊ फेब्रुवारी रोजी फासावर लटकवण्यात आलं होतं. त्यामुळे याच तारखेच्या आसपास घातपाताचा त्यांचा डाव होता. तसंच ताल्हा रशीद आणि उस्मान हैदरचा खात्मा करण्यात आला होता. मसूद अझरच्या पुतण्यालाही ठार करण्यात आलं होतं. त्यामुळेही जैशचे अतिरेकी बदला घेण्याची संधी शोधत होते. पुलवामामध्ये ज्या ठिकाणी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला ते ठिकाण आदिल दार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे. तिथूनच त्यानं त्याची गाडी सुमारे दोनशे किलो स्फोटकांनी भरून आणली होती. हीच गाडी भरधाव वेगानं त्यानं सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवून आत्मघाती हल्ला घडवून आणला.
आदिल दार याला स्फोट घडवण्यासाठी जे वाहन देण्यात आलं, ते लोकल मदतीमुळे मिळालं. याचाच अर्थ दहशतवाद्यांचा स्लीपर सेल हा किती मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे, हे लक्षात येतं. या स्लीपर सेलकडे पाकिस्तानातले दहशतवादी स्फोटकं पुरवतात.
पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अनेक तळ आहेत. अनेक दहशतवादी संघटना तिथं कार्यरत आहेत. मसूद अझरच्या जैश ए महंमदनं काश्मीरसह भारतात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले केले आहेत. पाकिस्तानात जैश ए महंमदचा तळ आहे. त्याच ठिकाणी आतापर्यंत अनेक हल्ल्यांचा कट शिजलाय. पुलवामातल्या आत्मघाती हल्ल्याचा कटही त्याच ठिकाणी शिजला. आदिल दार हा काश्मीरमधून तिथं पोहोचला होता.
एक वर्षापासून आदिलचं पाकिस्तानात मानवी बॉम्ब बनण्याचं ट्रेनिंग सुरू होतं.
सहा महिन्यांपूर्वी जैश ए महंमदने मोठ्या हल्ल्याचा कट आखला. कट रचण्यात आला त्यावेळी मानवी बॉम्ब बणून आत्मघाती हल्ला करण्यासाठीचं आदिल दार याचं तेव्हा तिथेच ट्रेनिंग सुरू होतं. जैश ए महंमदचा म्होरक्या मसूद अझर, आदिल दारसह तिघांनी हल्ल्याचा कट रचला. जैशच्या मुख्यालयात या कटाची माहिती फक्त मसूद अझर याला होती. भारतातल्या त्यांच्या स्लीपर सेललाही या कटाची माहिती नव्हती. त्यांना फक्त लोकल सपोर्ट देण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दक्षिण काश्मीरमधले पुलवामा, त्राल हे दहशतवाद्यांचे गड मानले जातात. या भागात दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो. इथंच आदिल दार आणि त्याच्या हॅण्डलरलाही आश्रय मिळाला. त्यांना स्थानिक पातळीवरूनही मदत झाली. जर या दोघांना आश्रय मिळाला नसता, मदत मिळाली नसती तर हा हल्ला टळला असता.
काश्मीर खो-यातल्या नागरिकांची मानसिकता ही भारतविरोधी आहे. काश्मीरच्या कॅन्सरमुळे भारताच्या इतर भागांचं नुकसान होतंय. त्यावर आता जालीम उपाय करण्याची गरज आहे. त्यामुळे चर्चा, वाटाघाटी असल्या निरर्थक गोष्टींमध्ये वेळ न घालवता सरकारने बॉम्ब आणि बुलेटची भाषा करावी. आणि तसं होत नसेल तर ती 56 इंचाची छाती, मोदी जॅकेटमध्येच लपवून ठेवावी.
खूप छान!
ReplyDeleteपण त्या अतिरेक्यांचा फोटो, नको टाकू.
विनाकारण प्रसिध्दी मिळते.